Pudhari
VerifiedNewspaper
Pudhari is a popular Marathi daily, printed in three centers and distributed in Maharashtra, Goa and North Karnataka. It is the leader in Kolhapur and Western Maharashtra and the third-largest Marathi newspaper daily in the entire state of Maharashtra. Alongside Satyawadi, it is one of the two oldest surviving newspapers in the state. Source
Actions
Media Outlet details
| Scope | Local |
|---|---|
| Language | Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
| Frequency | Daily |
| Days Published | N/A |
Recent Articles
Search ArticlesRatnagiri News : अंजणारी घाटात ट्रक उलटून चालक ठार
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटातील तीव्र उतारावर ट्रक पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम सिंग (५८, रा. सुकरताल, उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. श्याम सिंग हे ट्रक (एचआर-३८ एक्स ०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लायडिंगचे साहित्य घेऊन जात होते. अंजणारी घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो महामार्गावर उलटला. या अपघातात श्याम सिंग गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Ganpatipule Beach : पालकमंत्र्यांच्या आदेशाने गणपतीपुळे बीच खुला
गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेचा समुद्रकिनारा जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी अचानक बंद करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशाने शनिवारपासून (५ सप्टेंबर) गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बीच बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
Rashi Bhavishya Today: आज भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका? तुमची रास काय सांगते?
कर्क : कामात एकाग्रता राखणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण शांत राहील. Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi - ज्यो. मंगेश महाडिक वृषभ : कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन : मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी संवाद वाढेल. नवीन योजनांवर विचार होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. कर्क : कामात एकाग्रता राखणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
Kolhapur News : अहिल्या गीताचे १३८ फूट लांब हस्तलिखित, ७० मंदिरांचा सुवर्ण नकाशा सापडला
देशातील ७० मंदिरांचे संरक्षण कार्य प्रकाशात सुवर्णचित्रित भारताचा नकाशा अहिल्याबाईंच्या कार्याची व्याप्ती सांगणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. अहिल्याबाईंनी भारतातील सुमारे ७० मंदिरांचे पुनरुज्जीवन, दुरुस्ती किंवा संरक्षणकार्य केले. घाट, विहिरी, धर्मशाळा आणि यात्रेकरूंसाठी सार्वजनिक सुविधा उभारल्या.
Kolhapur News : ऊस रोपांच्या पैशांवरून चालकाचे अपहरण
नृसिंहवाडी : उसाच्या रोपांची विक्री करून आलेले पैसे मालकाला न दिल्याच्या रागातून एका वाहन चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे घडली आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी तिघा सख्ख्या भावांसह अन्य साथीदारांवर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष मारहाणीत निहालअहमद झाकिरहुसेन मेहतर (वय ३०, रा. शाहूनगर, इचलकरंजी) हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Adoption process : दत्तक प्रक्रियेत पालकांकडून मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती, देशात महाराष्ट्र आघाडीवर
कोल्हापूर : जन्मदात्या आई, वडिलांचे छत्र हरवले, म्हणून आयुष्यभर मायेपासून वंचित राहावेच लागेल असे नाही. दत्तक प्रक्रियेतून महाराष्ट्रातील हजारो चिमुकल्यांच्या आयुष्याला आई, वडिलांच्या प्रेमाची नवी ऊब मिळाली आहे. विशेष म्हणजे, 'मुलगा हवा' या पारंपरिक मानसिकतेला छेद देणारे चित्र दत्तक प्रक्रियेत दिसत आहे. पालकांकडून मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती मिळत आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातील २,८९२ चिमुकल्यांना दत्तक घेण्यात आले असून, यामध्ये १,४९८ मुली आणि १,२९४ मुलांचा समावेश आहे.
Belgaum Vegetable Market: आवक वाढल्याने भाजीपाला स्वस्त; कांदा महागला
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात आवक वाढल्याने टोमॅटो, पालेभाज्या दर उतरले आहेत. मात्र, कांदा बाजारात प्रति क्विंटल दर २,५०० ते ५,००० रूपये झाला आहे. दरात ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. साखर प्रती किलो दर ५४ रूपये आहे. किरकोळ बाजारात कांदा ४० ते ६० रूपये किलो झाला आहे. कांदापात, कोथिंबीर, लाल भाजी, शेपू आदींचे दर कमी झाले आहेत. होलसेल बाजारात टोमॅटो ५ रूपये किलो झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.५) लाल बटाटा प्रतिक्विंटल दर १,५०० ते २,४०० रूपये आहे.
Kolhapur News : जिल्ह्यातील रेशन धान्य दुकाने उद्या बंद
कोल्हापूर : राज्यातील रास्त भाव दुकानांत ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करताना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या तांत्रिक त्रुटींमुळे संपूर्ण धान्य वितरण प्रक्रिया पूर्णपणे कोलमडून पडली आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्व दुकाने एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे. ई-पॉस मशिनचा वेग कमी राहत असल्याने प्रत्येक व्यवहारासाठी वेळ लागत आहे.
Kolhapur News : टोल नाक्यावरील शेड हटविले; मात्र जीवघेणे स्पीड ब्रेकर कायम
कोल्हापूर : महापालिकेने शहरातील टोल नाक्यांवरील टोल शेड काढले आहेत; मात्र त्या ठिकाणी असलेले अर्धवट आणि खराब झालेले स्पीड ब्रेकर अद्याप तसेच असल्याने वाहनचालकांसाठी ते धोकादायक ठरत आहेत. तुटलेल्या व अर्धवट स्पीड ब्रेकरमुळे वाहनधारकांना जोरदार धक्के बसत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे स्पीड ब्रेकर धोकादायक ठरत आहेत.
Belgaum Cannabis Seized: तिघांकडून एक किलो गांजा जप्त
बेळगाव : तिघांकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करून त्यांना अटक केली. सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली. यातील चौथा संशयित फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (वय २०, रा. गुरूवार पेठ, कित्तूर), आदर्श इरय्या हिरेमठ (वय २५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) व मणीकंठ राचय्या उगरखोड (वय २०, रा. गुरूवार पेठ, कित्तूर) यांचा समावेश आहे. यातील चौथा संशयित मैताब (रा. बेळगाव) याच्याकडून त्यांनी गांजा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे.