Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Amar Mohite
Nutritional Strategies for Enhancing Animal Health and Performance: A Veterinary Approach
Receiving Papers for the New Issue Last Date of Submission: April 30th, 2024 If you would like to apply for the position of an Editorial Board Member/Reviewer on the journal, please contact the Editor including your CV and a brief covering letter detailing why you are a suitable candidate, to editor@veterinaria.org.
Deepak Tijori : पोलीस कल्याण निधीसाठी 25 हजार जमा करा; हायकोर्टाचे दीपक तिजोरीला आदेश
मुंबईः अभिनेता दीपक तिजोरी व निर्माता मोहन नादर यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. या सुनावणीसाठी दीपक तिजोरी न्यायालयात हजर होते. दीपक तिजोरी यांनी मोहन नादर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नादर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. नितीन साम्बरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खडंपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
Bombay HC : पती@85, पत्नी@79; घटस्फोटानंतरही वाद मिटेना, घराच्या विक्रीसाठी हायकोर्टात याचिका
अमर मोहिते मुंबईः 85 वर्षीय पती आणि 79 वर्षीय पत्नी, या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. पण त्यांच्यातील वाद काही संपलेला नाही. मुलुंड येथील घर विकून मला पैसे द्या, अशी मागणी करणारी याचिका पतीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे नऊ खंडपीठासमोर या मुद्द्यावर सुनावणी झाली. तरीही त्यावर तोडगा निघालेला नाही. विभक्त झालेल्या जोडप्याला दोन मुले आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे तर एक मुलगा इंजिनियअर आहे. एक मुलगा वडिलांची काळजी घेतो तर एक मुलगा आईचे संगोपन करतो. या जोडप्याच्या नावे मुलुंड येथे घर आहे.
गटारांवरील धोके दिसण्यासाठी पालिकेला न्यायालयाचे अंजन!
महाभारतात राजा धृतराष्ट्र यांना लढाईची इत्थंभूत माहिती देण्यासाठी संजय नावाचं पात्र होतं. धृतराष्ट्र अंध असल्याने संजय क्षणाक्षणाची माहिती त्यांना देत होता. दुःख, आनंद सर्वच धृतराष्ट्र यांना संजयमार्फत कळत होतं. त्यानुसार ते व्यक्त व्हायचे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या मुंबई महापालिकेची आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती, ढिगभर प्रकल्प, सोयीसुविधांचे मोठाले जाळे, असे सर्व या पालिकेचे कार्यक्षेत्र आहे, पण एवढी मोठी पालिका धृतराष्ट्रासारखी आंधळी आहे. महाभारतातील संजय भूमिका सध्या न्यायालय बजावत आहे.
Shrikant Shinde : युतीतील वादावर श्रीकांत शिंदे म्हणाले, खालच्या स्तरावर…; कार्यक्रमाला रविंद्र चव्हाण गैरहजर
कल्याणः भाजप आणि शिवसेना, आम्ही एकत्र होतो, आणि आहोत, असे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी दिले. कल्याण लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीकांत शिंदे यांनी युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले असले तरी या कार्यक्रमाला भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण हे गैरहजर होते. कार्यक्रमाच्या बॅनरवर फोटो असून आमदार रविंद्र चव्हाण गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कविर्तक लढवले जात होते.
MRF : शेअर बाजारात एमआरएफची मुसंडी; एक Share एक लाख रुपये
नवी दिल्लीः Madras Rubber Factory (MRF) कंपनीने शेअर मार्केटमध्ये मुसंडी मारली आहे. आज MRF च्या एका शेअरची किंमती तब्बल एक लाख रुपये झाली. शेअरची किमत एक लाखाच्या घरात गेलेली MRF ही शेअर मार्केटमधील पहिली कंपनी आहे. कंपनीने गाठलेल्या उच्चांकामुळे अनेक गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. १९९० साली या कंपनीच्या शेअर्सची किमत ३७० रुपये होती. तेव्हा या कंपनीचे शेअर्स घेणाऱ्यांना आज लॉटरीच लागली आहे. आज शेअर बाजार उघडला तोच गुंतवणूकदारांसाठी खुशखबर घेऊन. MRF च्या शेअर्सने १.४८ टक्क्यांनी वाढला.
चौकशीच्या टोपीखाली दडलंय काय, अदानींची कॉलर टाईट!
अमर मोहिते अदानी उद्योग समूहावरील हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती नेमली. या समितीने आपला अहवाल सादर केला. हा अहवाल चक्रावून टाकणारा आहे. चक्रावून म्हणण्यापेक्षा नेमकी काय चौकशी झाली याची चौकशी करायला एक समितीच नेमणे योग्य ठरेल. कारण समितीने जो अहवाल दिला आहे, तो अहवाल अप्रत्यक्षपणे अदानीचे कौतुक करणारा आहे. त्यामुळे या चौकशीच्या टोपीखाली नेमकं काय दडलंय याचे गूढ कायम आहे.
पाकिस्तानातून आलेले हिंदू भारतातही झाले बेघर; १५० नागरिकांच्या घरावर फिरला बुलडोझर
नवी दिल्लीः पाकिस्तानातून राजस्थानमध्ये आलेल्या हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. लहान मुलांसह १५० नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना भर उन्हात रहावे लागत आहे. जैसलमेर येथील जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे. कारवाईमुळे जिल्हाधिकारी डाबी यांच्यावर टीका होत आहे. जैसलमेर येथे नगर विकास संस्थेचा अमर सागर पंचायतमध्ये भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण मंगळवारी हटवण्यात आले. मुळात येथे पाकिस्तानातून आलेले हिंदू राहत होते.
पाकिस्तानातून आलेले हिंदू भारतातही झाले बेघर; १५० नागरिकांच्या घरावर बुलडोझर
नवी दिल्लीः पाकिस्तानातून राजस्थानमध्ये आलेल्या हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. लहान मुलांसह १५० नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना भर उन्हात रहावे लागत आहे. जैसलमेर येथील जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे. कारवाईमुळे जिल्हाधिकारी डाबी यांच्यावर टीका होत आहे. जैसलमेर येथे नगर विकास संस्थेचा अमर सागर पंचायतमध्ये भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण मंगळवारी हटवण्यात आले. मुळात येथे पाकिस्तानातून आलेले हिंदू राहत होते.
सरकारची हंडी उंचावर गेली, फोडायला जाल तर कोसळाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला
मुंबईः सरकारची हंडी खूप उंचावर गेली आहे. आमची हंडी फोडायला जाल तर कोसळाल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विरोधकांना लगावला. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मवीर आनंद दिघे हे टेंभी नाक्याला उंच हंडी लावायचे. ही हंडी फोडायला माझगावमधून पथक यायच. उंच हंडी फोडण्याचा मान त्यांचा होता. अशाच प्रकारे आम्ही दहा महिन्यांपूर्वी सरकारची हंडी फोडली. आता आमच्या सरकारची हंडी खूप उंचावर गेली आहे. ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही कोसळाल, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालात ‘मायावती’ कनेक्शन; बसपा फुटली तेव्हा…
अमर मोहिते नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालात अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्यातील बहुजन समाज पार्टीत (बसपा) पडलेली फूट आणि त्यावेळी न्यायालयाने दिलेला निकाल याचा तपशील निकालपत्रात देण्यात आला आहे. तसेच संसद किंवा विधिमंडळ सदस्याने सभागृहात हजर असणे याचा नेमका अर्थ कसा घ्यावा, या विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले विश्लेषण हेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे. बसपच्या प्रमुख मायावती यांनी मे २००२ मध्ये सत्ता स्थापन केली होती.
पक्षफुटीच्या आधीची घटना ग्राह्य धरा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
अमर मोहिते नवी दिल्लीः विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेताना पक्ष फुटीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सादर झालेली घटना ग्राह्य धरायला हवी, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालपत्रात नोंदवले आहे. विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि व्हीप यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे ठरवत असताना विधानसभा अध्यक्षांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, याबाबतही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
… तर निवडणूक आयोगाचा निकाल पूर्वलक्षीप्रभावाने लागू होईल; न्यायालयाचे निरीक्षण, नार्वेकरांची कोंडी
अमर मोहिते नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेणे चुकीचे ठरेल. कारण तसे केले तर निवडणूक आयोगाचा निकाल पूर्वलक्षीप्रभावाने लागू हाईल आणि ते कायद्याच्या विरोधात ठरेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना मीच ठरवेन पक्ष कोणाचा आणि व्हीप कोणाचा असे वक्तव्य करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता कशाप्रकारे निर्णय घेतील हे बघावे लागेल. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
‘त्या’ आमदारांनी मतदान केले म्हणून नार्वेकरांची निवड बेकायदा? सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
अमर मोहिते नवी दिल्लीः अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या मतदानात सहभागी झाले म्हणून त्यांची निवड बेकायदा ठरवली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले, संविधानाचे अनुच्छेद १८९(२) नुसार आमदारांना मतदान करता येत नाही. पण तशीच परिस्थिती असावी लागते. नार्वेकर यांची निवड होताना तशी परिस्थिती नव्हती. विधिमंडळाचे कामकाज हे संभाव्य निर्णयाच्या आधारावर चालत नाही.
honey trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती
पुणेः शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या ईमेलमध्ये आढळलेले संशयास्पद मेल हे पाकिस्तानचे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाने पुणे विशेष सत्र न्यायालयात दिली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. डॉ. कुरुलकर यांच्या सोशल मीडियातून फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स् शेअर झाल्या आहेत. त्यांच्या मोबाईल आणि अन्य डिव्हाइसमधून डिलिट झालेला डेटा फॉरेन्सिक लॅबकडून पुन्हा प्राप्त झाला आहे. या डेटाचा तपशील घेण्याचे काम सुरु आहे.
सरकारी धोरणांचे न्यायालयाकडून झालेले ‘शवविच्छेदन’
महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्य शासन आणि मग केंद्र शासन अशी साधारणतः आपल्या देशाची मांडणी आहे. प्रत्येक स्तरावर नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी, त्यांना काय हवं नको ते बघण्यासाठी एक नियोजन करण्यात आले आहे. बुद्धिजीवी अधिकारी आणि राजकारणी यांनी मिळून तशी आखणी केली आहे. त्यानुसार जनहितार्थ एखादे धोरण ठरवले जाते. प्रकल्प हाती घेतले जातात. रोजगार निर्मिती होते. वर्षानुवर्षे याच पद्धतीने आपल्या देशात कारभार सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या कारभारात काही दोष आढळत आहेत.
अभिजीत पाटील राष्ट्रवादीत; भाजपशी जवळीक असूनही पवारांच्या गळाला
सोलापूरः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षासोबत जवळीक असलेले साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील हे महाराष्ट्रातील पाच साखर कारखाने चालवत आहेत. त्यामुळे पाटील नेमके कोणत्या पक्षात जातील याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पाटील हे राष्ट्रवादीत गेल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपला मोठे आव्हान तयार झाल्याचे बोलले जात आहे. पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
देवेंद्र फडणवीसांना हायकोर्टाचा झटका; एकनाथ शिंदेंच्या आदेशावर शिक्कामोर्तब
अमर मोहिते मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१६ मध्ये नगर विकास मंत्री असताना दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या असलेल्या याच खात्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये जारी केलेल्या आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. कोल्हापूर येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पापासून किती किमी अंतरावर बांधकाम करता येणार नाही या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी निर्णय दिला होता.
हायकोर्टाने शिंदे सरकारला दिले हे महत्त्वपूर्ण आदेश; सहा महिन्यांत करावी लागणार कार्यवाही
अमर मोहिते मुंबईः आरक्षण संपुष्टात येत असलेल्या भूखंडाचा ताबा सहा महिन्यात घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहेत. त्यामुळे 127 (2) of the MRTP Act अंतर्गत संपूर्ण राज्यभरात आरक्षित केलेल्या भूंखडांचा ताबा सहा महिन्यांत घेण्याची कार्यवाही सरकारला करावी लागणार आहे. न्या. गिरीष कुलकर्णी व न्या. कमल खट्टा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. 127 (2) of the MRTP Act अंतर्गत राज्य शासनाने भूखंड आरक्षित केले असतील.
मिरा-भाईंदर महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या दोन पतपेढ्या; हायकोर्टाने काढला असा तोडगा…
अमर मोहिते मुंबईः मिरा-भाईंदर महापालिकेतील दोन पतपेढ्यांचा वाद उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढला. नव्याने नोंदणी झालेल्या पतपेढीने त्यांचे नाव बदलावे, जेणेकरुन त्यांची स्वतंत्र ओळख तयार होईल. तसेच त्यांनी १ जून २०२३ पासून आपला कारभार सुरु करावा, असा निकाल न्यायालयाने दिला. त्यामुळे मिरा-भाईंदर पालिकेत कर्मचाऱ्यांच्या दोन पतपेढ्या कार्यरत राहतील. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
पत्नीचा होतोय दुसरा विवाह; पतीची हायकोर्टात धाव, पोलीस करणार चौकशी
अमर मोहिते मुंबईः माझ्या पत्नीचा जबरदस्तीने दुसरा विवाह होत आहे. त्यामुळे माझ्या पत्नीला न्यायालयात हजर करा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका पतीने उच्च न्यायालयात केली आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. पत्नीचा विवाह नक्की जबरदस्तीने करण्यात येत आहे की तिच्या इच्छेने दुसरा विवाह होत आहे, याची चौकशी पोलीस करणार आहेत. या चौकशीची माहिती न्यायालयाला देण्यात येईल, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले.
अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या ऐवजी बहिणाला मिळाली जागा; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुंबईः अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या ऐवजी बहिणाचे नाव टाकावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कारण अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या उमेदवाराचे निधन झाल्याशिवाय दुसऱ्या कुटुंब सदस्याचे नाव तेथे टाकता येत नाही, असा राज्य शासनाचा नियम आहे. मात्र बहिणीला नोकरी देण्यास भावाची संमती आहे. बहिण आईची काळजी घेणार आहे. त्यामुळे बहिणीचे नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात काहीच अडथळा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. रमेश धानुका व न्या.
बृजभूषण सिंह विरोधात आजच दाखल होणार गुन्हा; दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आजच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. त्यानुसार त्याचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. हा गुन्हा आजच नोंदवला जाईल, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
जीव महत्त्वाचा : पत्नीच्या विरोधानंतरही पती करू शकतो अवयवदान; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
अमर मोहिते मुंबईः राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. पती-पत्नीमधील वाद या अधिकारात अडथळा ठरु शकत नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका अयवयदानाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मेव्हण्याची किडनी मिळू शकते. याप्रकरणी ६५ वर्षीय प्रसन्ना लक्ष्मीकांत जोशी, ५५ वर्षीय दिनेश विद्याधर दिक्षित यांनी याचिका केली होती.
ओशो आश्रमात जाण्यास मनाई नाही; नियम करायचे असतील तर धर्मादाय आयुक्तांकडे जा- हायकोर्ट
अमर मोहिते मुंबईः ओशे आश्रमात जाण्यास मनाई करण्यात आलेली नाही. व्यवस्थापनेला काही नियम करायचे असल्यास त्यांनी उप किंवा सह धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करावा. धर्मादाय आयुक्तांनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुकेश कांतीलाल सरडा उर्फ स्वामी मुकेश भारती यांनी यासाठी अर्ज केला होता. हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
विरारच्या ३० हजार नागरिकांना हायकोर्टाचा दिलासा; झोपडपट्टी तोडण्यास स्थगिती
अमर मोहिते मुंबईः विरार रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीधारकांना घरं खाली करण्याच्या पश्चिम रेल्वेच्या नोटीसला उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. त्यामुळे येथील ३० हजार झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे. न्या. गौतम पटेल व न्या. निला गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या नोटीसनुसार २७ तारखेपर्यंत येथील झोपडपट्टीधारकांना घरं खाली करायची होती. त्यानंतर रेल्वे प्रशासन येथील झोपड्यांवर कारवाई करणार होती. न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ही कारवाई तूर्त स्थगित झाली आहे.
सामान पोहोचवायचे ८६ हजार, खोदकामाचे १६ हजार; हायकोर्टाचे शिक्कामोर्तब
अमर मोहिते मुंबईः उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि अदानी कंपनीत खोदकामाच्या ठिकाणी सामान पोहोचवणाऱ्या कायमस्वरुपी अकुशल कामगारांना ८६ हजार रुपये वेतन दिले जाते तर प्रत्यक्ष खोदकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अवघे १६ हजार रुपये वेतन दिले जाते, असा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. अतिरिक्त कामगार आयुक्तांनीदेखील ही मागणी फेटाळून लावली होती.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची धाकधूक वाढली; सरन्यायाधीशांसह दोन न्यायाधीश क्वारंटाइन
अमर मोहिते नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षचा निकाल कधी लागेल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठातील एक न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड हे क्वारंटाइन झाले आहेत. परिणामी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची धाकधूक आणखी वाढली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी की नाही या मुद्द्यावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. संजय कृष्णा कौल, न्या. एस.
बुलेट ट्रेनला जोडणाऱ्या पुलाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; शिळफाटा ते कल्याण मार्गाची वाहतूककोंडी सुटणार
अमर मोहिते मुंबईः आगासन ते कल्याण येथील देसाई खाडीवर उड्डाणपूल बांधण्यास उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला परवानगी दिली आहे. हा पूल बुलेट ट्रेनला जोडणारा आहे. हा पूल झाल्यानंतर कल्याण ते शिळफाटा येथील वाहतूककोंडीही सुटणार आहे. देसाई खाडीवर उड्डाणपूल बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज ठाणे महानगरपालिकेने न्यायालयात केला होता. कल्याण शिळफाटा ते आगासन जोडण्यासाठी हा पूल ठाणे महापालिकेला बांधायचा आहे.
Mat give benefit of old pension scheme to prosecutors
अमर मोहिते मुंबईः तेरा अतिरिक्त सरकारी वकीलांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) दिला आहे. नोकरभरतीच्या जाहिरातीत जुन्या पेंन्शनचे आश्वासन असेल तर राज्य शासन नंतर घुमजाव करु शकत नाही, असा निर्वाळाही मॅटने दिला आहे. राजेंद्र पाटील, शोभा विजयसेनानी, अशोक सोनावणे, सतिश नाईकवडे, वैशाली पाटील.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘एसआयटी’; बेकायदेशीर कर्ज देणारे लोकायुक्तांच्या रडारवर
अमर मोहिते मुंबईः शेतकऱ्यांना बेकादेशीररित्या कर्ज देणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल याचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास यंत्रणेची (एसआयटी) स्थापना करावी. शेतकरी का आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नेमके काय करता येईल, याचा आढावाही एसआयटीने घ्यावा, असेही आदेश लोकायुक्त विद्यासागर कानडे यांनी दिले आहेत. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी याचा अहवाल चार आठवड्यात सादर करावा, असे आदेश देत लोकायुक्त कानडे यांनी ही सुनावणी तहकूब केली.
पत्राचाळच्या रहिवाशांना घर कधी मिळणार? हायकोर्टाने म्हाडाकडे मागितले उत्तर
अमर मोहिते मुंबईः पत्राचाळीचा पुनर्विकास कधी पूर्ण करणार आणि रहिवाशांना कधी घर मिळणार याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. रहिवाशांना नियमित भाडे कधी दिले जाणार याचीही माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्या. गौतम पटेल व न्या. निला गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काचं घर मिळायला हवं. त्यांना घरभाडं मिळायला हवं हाच आमचा मुख्य हेतू आहे. याप्रकरणात म्हाडाचेही नुकसान झाले. आम्ही म्हाडाला दोष देत नाही.
दिलासा : ‘सेव्ह आरे’चा मेसेज करणाऱ्या पर्यावरणवादीवरील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द
अमर मोहिते मुंबईः मेट्रो कारशेडसाठी आरे येथील झाडे तोडू नये अशी विनंती करणारा मेसेज करणाऱ्याविरोधात पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. बॅंगलोर येथील अविजित मिखाईल यांनी हा मेसेज केल्याचा आरोप होता. या मेसेजमध्ये अविजितने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांना आरे येथील झाडे वाचवण्याची विनंती केली होती. न्या. सुनील शुक्रे व न्या. एम. एम. साठे यांनी हा गुन्हा रद्द केला.
इस्रोची रॉकेट प्रक्षेपणात जम्बो कामगिरी; एकाच वेळी ३६ उपग्रह अंतराळात
श्रीहरीकोटः भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)ने रविवारी सकाळी 9 वाजता रॉकेटचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम 3-एम 3 या देशातील सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या रॉकेटच्या माध्यमातू एकाच वेळी ३६ उपग्रह अवकाशामध्ये स्थापित करण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एलव्हीएम3 चे हे सहावे उड्डाण आहे. याआधी ते जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल एमके 3 (जीएसएल व्हीएमके 3) म्हणून ओळखले जात होते.
न्यायालयाच्या तराजूत तोलला समानतेचा न्याय!
अमर मोहिते भारतासारख्या देशात विविध जातीधर्माचे लोक राहत असल्यामुळे बरेचदा धार्मिक आणि भावनिक कारणावरून गुंता निर्माण होतो, त्यातून तणावाचे वातावरण तयार होते. अशावेळी समानतेची जाणीव करून देण्याची गरज असते. सर्वसामान्य माणूस जेव्हा पेचात सापडतो तेव्हा न्यायव्यवस्था त्याच्या कामी येते. घर ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यावरून निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी न्यायालयाने पुढाकार घेतला आहे.
महामुंबईतील अनधिकृत बांधकामांवर आकाशातून राहणार लक्ष; उदय सामंतांची विधानसभेत माहिती
मुंबईः मुंबई व उपनगरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर ड्रोन किंवा सॅटेलाईटने लक्ष ठेवले जाईल. यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल सात दिवसांत घेऊन मुंबई व अन्य पालिकांना अशी यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत शुक्रवारी जाहिर केले. मुंबईत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला.
गृहनिर्माण सोसायटीतील छुपा जातियवाद; इतर समाजासाठी घर खरेदीतील ‘ही’ अट हायकोर्टाला अमान्य
मुंबईः इमारतीमध्ये तुमच्या समाजाचे पाच टक्के सदस्य असतील तरच तुम्ही घर घेऊ शकता ही एका गृहनिर्माण सोसायटीची अट मान्य करण्यास उच्च न्यायालायने नकार दिला आहे. न्या. राजेश पाटील यांनी हा निकाल दिला आहे. अशा नियमांना मान्यता दिल्यास गृहनिर्माण सोसायटी धार्मिक आधारावर विभागली जाईल. इमारतीची उभारणी धार्मिक आधारावर होत नाही. तुमच्या समाजाचे पाच टक्के रहिवासी सोसायटीमध्ये असतील तरच तुम्हाला तेथे घर घेता येईल ही अट मान्य केल्यास पुढे ते घर विकतानाही अडचण येऊ शकते. त्या समाजाचा घर खरेदी करणारा शोधावा लागेल.
मुंबई आहे की डान्स बार, तेच कळत नाही; सुशोभीकरणावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबईः मुंबईच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरु आहे. दिवे लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस मुंबई आहे की डान्स बार आहे हेच कळत नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाणला. राज ठाकरे म्हणाले, जगभरात कसे सुशोभीकरण सुरु आहे ते बघ जरा एकदा. कशी स्वच्छता राखली जाते. आणि आपल्या येथे लाईटी लावल्या जातात. त्या तेथे सिंहाच्या मागे लाईट लावली आहे. रात्रीच्या वेळेस ते कसं दिसतं. असं वाटतं की सिंहाला मुळव्याध झाला आहे. सविस्तर वृत्त लवकरच
धोकादायक, असुरक्षित इमारतींच्या पुनर्विकासासाठी 100 टक्के संमतीची सक्ती नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
मुंबईः धोकादायक व असुरक्षित इमारतींच्या पुनर्विकासासाठी 100 टक्के भाडेकरूंची संमती आवश्यक नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. सी-१ मध्ये मोडत असलेल्या अशा खाजगी व पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ५१ ते ७० टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची ही अट रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका राज अहुजा व जैन एम अहुजा यांनी केली होती. गोरेगाव येथील जय प्रकाश नगर येथे मधू इस्टेट ही एक मजली इमारत होती. तेथे ३९ औद्योगिक गाळे होते.
सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काढलेले दुभाजक ‘त्या’ महिलेच्या मृत्यूला कारणीभूत; जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?
मुंबईः वरळी सी लिंकवर एका धावपटू महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईची तोडफोड करण्याचे काम सुरु आहे. सी लिंकवरचे दुभाजक काढले. तेथील सर्व काढून टाकले आहे. तेथे आता काहीच नाही. त्या ठिकाणी त्या धावपटू महिलेचा मृत्यू झाला, याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. जयंत पाटील म्हणाले, सध्या मुंबईच्या सुशोभकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुंबई आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही काय करु शकतो हे दाखवण्याचे काम भाजप करत आहेत.
सिध्दिविनायक मंदिराच्या खजिनदाराची सीबीआय चौकशी; आमदार सरवणकरांच्या मागणीला राज्य सरकारचा प्रतिसाद
मुंबईः सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार संजय सावंत यांची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत सोमवारी केली. या मागणीची राज्य शासनाने दखल घ्यावी, असे आदेश तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिले. ही मागणी पटलावरुन काढून टाकावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यास तालिका अध्यक्ष भुसारा यांनी नकार दिला. आमदार सदा सरवणकर म्हणाले, आज दुपारी बागेश्वर महाराज मुंबईत आले होते. त्यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
…तर कठोर कारवाई करा; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावरून हायकोर्टाचे पोलिसांना आदेश
मुंबईः मिरा-भाईंदर येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात महाराज धीरेंद्र शास्त्री किंवा त्यांच्या समर्थकांकडून काही आक्षेपार्ह कृती घडल्यास पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कार्यक्रमा विरोधात दीपक दिलीप जगदे यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. न्या. रमेश धानुका व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
शितल म्हात्रे व्हिडिओ मॉर्फिंगचा तपास एसआयटीकडे- शंभूराज देसाईंची घोषणा
मुंबईः शिवसेना आमदार शितल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फिंग केल्याप्रकरणी वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे, अशी घोषणा गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी सोमवारी विधानसभेत केली. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी विनायक डावरे हा ठाकरे गटाचा आहे. त्याने हा व्हिडिओ मातोश्री फेसबुक पेजवरून व्हायरल केला. इतर आरोपींनीही तो व्हिडिओ व्हायरल केला, अशी कबुली दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे.
शरण येत नसेल तर अटक करा; कोर्टाचे आदेश, पतीची हत्या ६९ व्या वर्षी पत्नीला भोवली
मुंबईः सुमारे २३ वर्षांपूर्वी पत्नीने पतीची हत्या केली. त्यावेळी पत्नीचे वय ४५ वर्षे होते. आता तिचे वय अंदाजे ६९ वर्षे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या पत्नीला पतीच्या हत्येप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी पत्नीने पोलिसांना शरण यावे. पत्नी शरण नाही आली तर तिला पोलिसांनी अटक करावी. अटक करुन तिला कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठवावे, असे आदेश न्यायालयाने ठाण्यातील नौपाडा पोलिसांना दिले आहेत. ही घटना १७ मे १९९८ राजी सायंकाळी ६ वाजता नौपाडा येथे घडली.
राज्यात पारा 4 ते 5 अंशांनी वाढणार; कोकणात उष्माघाताची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
मुंबईः भारतीय हवामान विभागाने राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह, पालघर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे थोडा काळ उकाड्यापासून सुटका झाली असली, तरी पुन्हा अंगाची लाहीलाही करणार्या उष्णतेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आनंद आश्रमातून मुख्यमंत्र्यांच्या पिचकारीचा रोख नेमका कोणाकडे?
ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. मुख्यमंत्री यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी धरलेल्या पिचकारीचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा चांगलीच रंगली होती. मुख्यमंत्री शिंदे यांना रंग लावण्याचा मोह महिला पोलीस अधिकाऱ्यालाही आवरता आला नाही. गर्दीतून मार्ग काढत महिला पोलीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना रंग लावला.
Hakkabhanga notice sanjay raut after balasaheb thackeray
मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी हक्कभंगाची नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस दिल्यानंतर त्यांना दोन दिवसांत हक्कभंग समितीसमोर हजर राहावे लागेल. राऊत यांच्या आधी बाळासाहेब ठाकरे हेही हक्कभंग समितीसमोर आले होते. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी सभागृहात एक प्रस्ताव मांडला आणि बाळासाहेबांची शिक्षा रद्द झाली होती. सामना दैनिकात राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले होते. हे व्यंगचित्र विधानसभा अध्यक्षांचे होते. त्यामुळे आर. आर.
हायकोर्टाचा विमा कंपनीला दणका : जुळ्या मुलांच्या उपचार खर्चाचे मातेला मिळणार १६ लाख रुपये
मुंबईः जुळ्या मुलांच्या उपचारासाठी खर्च केलेले ११ लाख ५ हजार ५९३ रुपये विमा कंपनीने मातेला द्यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी new india assurance company ला दिले. तसेच विम्याची रक्कम मिळावी म्हणून त्या मातेला न्यायालयात याचिका करावी लागली. या याचिकेचा खर्च म्हणून कंपनीने मातेला अतिरिक्त पाच लाख रूपये द्यावेत असेही न्यायालयाने नमूद केले आहे. याप्रकरणी जोगेश्वरी येथील रिटा जोशी यांनी याचिका केली होती. त्यात new india assurance company, एम. डी.
खातेतंर्गत पीएसआय परीक्षेचा निकाल दहा वर्षांनी होणार जाहीर; मॅटचे आदेश
मुंबईः सन २०१३ मध्ये पोलीस उप निरीक्षक पदासाठी झालेल्या खातेतंर्गत लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) पोलीस खात्याला दिले आहेत. या परीक्षेला २०१३ मध्ये २८ हजारजण बसले होते. त्यातील १९ हजार जण ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांचा निकाल आता जाहीर होणार आहे. पोलीस नाईक, पोलीस हवालदार, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे खातेतंर्गत होणाऱ्या पोलीस उप निरीक्षक पदाच्या परीक्षेला पात्र असतील, असा नियमच सन २०१३ साली करण्यात आला.
म्हाडा, महापालिकेला हायकोर्टाचा दणका; विकासकाला परत मिळणार पाच कोटी
मुंबईः पुनर्विकासासाठी परवानग्या न मिळाल्याने विकासकाने पुनर्विकासाला नकार दिला. त्यामुळे त्याने म्हाडा व पालिकेकडे जमा केलेली रक्कम परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार म्हाडाला 2,56,98,711 रुपये तर पालिकेला 2,36,03,076 रुपये परत करावे लागणार आहेत. वर्सोवा अंधेरी शांतीवन कॉ. हॉ. सोसायटी सोबत म्हाडाने १५ ऑक्टोबर १९९३ रोजी करार केला. त्यानंतर सोसायटी व त्यांच्या सदस्यांनी वर्सोवा येथे घरे बांधली. सन २०१० मध्ये येथील इमारती जीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Amar
Contact Amar, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack