Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Lok Satta
कर्नाटकात भाजपाच्या पराभवाची ५ कारणं गिरीश कुबेर यांच्या शब्दांत! |Girish kuber |Karnataka Elections
कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. पण अखेर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. यासंदर्भात 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!
episode 35 krushnai ulekar.fb
महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी कृष्णाई उळेकर ही तरुणी वयाच्या दहाव्या वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. कृष्णाई ही मुळची आर्ली बुद्रुक (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील आहे. लोककलांच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, हुंडाबळी अशा सामाजिक विषयांवर ती समाजप्रबोधन करते. याच विषयामध्ये तिचं अध्यापन व संशोधन कार्यही सुरू आहे. कृष्णाईच्या कला क्षेत्रातील कामगिरीसाठी 'लोकसत्ता'च्या तरुण तेजांकित २०२२ या पुरस्काराने तिला सन्मानितही करण्यात आलं आहे.
Ajit Pawar on Sanjay Raut: संजय राऊतांवर अजित पवार संतापले; नाव न घेता म्हणाले...
विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा होती. यावर आता अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया देत आपण राष्टवादीतच आहोत, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं. इतर पक्षातील लोक राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात. हा विषय पक्षाच्या बैठकीतही मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
पत्रकारांचे प्रश्न अन् राजेश टोपेंनी थेट माईकच काढला; पाहा नेमकं झालं काय?| Rajesh Tope | Ajit Pawar
मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी सांगितलंय त्याचसोबत राष्ट्रवादीत बंडाबद्दल प्रश्न विचारला असता 'राष्ट्रवादी पक्ष एक संघ आहे आणि तसाच राहील' असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्याबद्दल मी कोणतेही भाष्य करणार नसल्याचा त्यांनी म्हटले.
"मी अजितदादांचा कट्टर समर्थक"; अण्णा बनसोडेंनी स्पष्ट केली भूमिका | Pimpari Chinchwad
विरोधीपक्ष नेते अजित पवार जो निर्णय घेतील, त्याला माझा पाठिंबा असेल, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही अजित पवारांबरोबर भाजपात जाणार, असंही म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने राष्ट्रवादीच्या गोटातील हालचाली वाढल्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; राज ठाकरेंनी शिंदें-फडणवीस सरकारला सुनावलं | Raj Thackeray
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; राज ठाकरेंनी शिंदें-फडणवीस सरकारला सुनावलं | Raj Thackeray महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्याने ११ लोकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली #maharashtrabhushan #eknathshinde #amitshah #devendrafadnavis #rajthackeray
"याच तुम्ही मैदानात..."; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान | Uddhav Thackeray
नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद आंदोलनासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा पुन्हा समाचार घेत भाजपाला थेट आव्हानही दिलं. बाबरी मशीद आंदोलनावेळी शिवसैनिक नव्हते, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
Uddhav Thackeray: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंविरोधात नारेबाजी | Nagpur
Uddhav Thackeray: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून उद्धव ठाकरेंविरोधात नारेबाजी | Nagpur माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मविआच्या सभेसाठी नागपूरात आगमन झाले असता विमानतळावरून हॉटेलकडे जात असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नारे दिले. 'उद्धव ठाकरे मुर्दाबाद' असे नारे देत यावेळी कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळले #uddhavthackeray #morcha #mavia #nagpur
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली; भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू | Pune - Mumbai Highway
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिग्रोबा मंदिराच्या पाठीमागे खासगी बसचा भीषण अपघात झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ जण प्रवास करत होते त्यांपैकी १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बस ४०० फूट खोल दरीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू | Pune - Mumbai Highway
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिग्रोबा मंदिराच्या पाठीमागे खासगी बस चा भीषण अपघात झाला असून १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये ४० ते ४५ जण प्रवास करत होते. पैकी १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून आढावा घेतला आहे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी..
शाळेची 'ही' अवस्था पाहा; जम्मूमधील चिमुकलीने मोदींना दाखवलं वास्तव | Jammu Kashmir
शाळेची 'ही' अवस्था पाहा; जम्मूमधील चिमुकलीने मोदींना दाखवलं वास्तव | Jammu Kashmir जम्मूमधील एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जम्मूच्या कठुआ येथील लोहिया मल्हार गावातील ही मुलगी आहे. सीरत नाज असं तिचं नाव आहे. पडझड झालेल्या आपल्या शाळेची अवस्था या मुलीने व्हिडीओत दाखवलीय. यासंदर्भात तिने काही तक्रारी करत मोदींकडे एक मागणी देखील केली आहे. ती काय म्हणालीय हे व्हिडीओत पाहा #jammukashmir #smallgirl #lohiya
शरद पवार, पूनम महाजनांसारखे नेते जेव्हा झाले होते..अभिनेते | गोष्ट पडद्यामागची:भाग-५१ |Pawar-Mahajan
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी चक्क नाटकात काम केलं आहे असं म्हणलं तर तुमचा विश्वास बसेल ? किंवा खासदार पूनम महाजन यांनी एका मराठी चित्रपटात अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका केली आहे असं म्हणलं तुमचा विश्वास बसेल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर गोष्ट पडद्यामागचीचा हा भाग नक्की पाहा
Rapper Ram Mungase: राम मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर; पहिल्यांदाच मांडली भूमिका
Rapper Ram Mungase: राम मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर; पहिल्यांदाच मांडली भूमिका रॅपर राम मुंगासे याचा "५० खोके" हे रॅप गाणं प्रसिद्ध झालं होतं. यावरून राम मुंगासेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र आता रामला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्याने या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राम मुंगासेचं गाणं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. त्यानंतर त्याची बरीच चर्चा रंगली होती.
Anjali Damaniya on Ajit Pawar: 'अजित पवारांची भाजपासोबत जवळीक असून...'; अंजली दमानियांचा दावा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानियांनी हा दावा करताना त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याची भूमिका अजिबात व्यवस्थित बजावत नसून त्यांची भाजपासोबत जवळीक दिसत आहे. असे विधान दमानियांनी केले. त्याचबरोबर 'भाजपा यामध्ये ईडीचा सर्रास गैरवापर करत दबाव निर्माण करतेय' असा आरोपही त्यांनी केलाय.
मंत्रालयात शूटिंग अनुभव; जब्बार पटेलांनी जागवल्या 'सिंहासन'च्या आठवणी | Sharad Pawar | Jabbar Patel
मंत्रालयात शूटिंग अनुभव; जब्बार पटेलांनी जागवल्या 'सिंहासन'च्या आठवणी | Sharad Pawar | Jabbar Patel 'सिंहासन’ हा ७०च्या दशकातील गाजलेला मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ४४ वर्ष पू्र्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सिंहासन चित्रपट आणि राजकीय वास्तवामध्ये साम्य काय? पवारांनी दिलं भन्नाट उत्तर | Sharad Pawar
सिंहासन चित्रपट आणि राजकीय वास्तवामध्ये साम्य काय? पवारांनी दिलं भन्नाट उत्तर | Sharad Pawar ७० च्या दशकात गाजलेला सिंहासन या मराठी चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सिंहासन चित्रपट आणि राजकीय वास्तव यांच्यातील साम्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेल्या भन्नाट उत्तराने एकच हशा पिकला
शिवसेनेतील बंड ते ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल; उद्धव ठाकरेंचं रोखठोक मत
लोकसत्ता 'लोकसंवाद' उपक्रमाचा चौथा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल, विरोधकांची एकजूट, अदाणी प्रकरण व एकंदरच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं.
Uddhav Thackeray on BJP: भाजपाला पर्याय कोण? उद्धव ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
Dalai Lama apologises after video asking boy to 'suck my tongue'
"काही लोक शाळेत असताना अयोध्येला गेल्याचं मी ऐकलं"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला| Uddhav Thackeray
Uddhav Thackeray did not answer my calls says Devendra Fadnavis
अदाणींच्या चौकशीसाठी JPC च का हवी? उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका | Uddhav Thackeray
अदाणी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या क्रार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं. लोकसंवाद उपक्रमाच्या चौथ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसंच शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
Uddhav Thackeray on Chandrakant Patil: "आता कोणाला जोडे मारणार?"; ठाकरेंचा शिंदेंना सवाल
Rappler's highlights: Marcos on EDCA, China drills, Taylor Swift & Joe Alwyn | The wRap | April 10, 2023 rapplerdotcom
कवितेतून मांडली शेतकऱ्याची व्यथा: सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल | viral video
एका व्यक्तीने शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता सादर केली आहे. यमक जुळवत केलेली ही कविता आजच्या परिस्थितीला साजेशी असून अनेकांनी सोशल मीडियावर याला पसंती दिली आहे. कविता म्हणणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Ajit Pawar on Gautam Adani: अजित पवारांकडून गौतम अदाणींची पाठराखण; म्हणाले, 'मी काही अंडरवर्ल्ड...'
अजित पवार यांनी गौतम अदाणी यांची पाठराखण केली. अजित पवार आणि गौतम अदाणी एकत्र असलेला एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना सवाल केला. त्यावर पवार म्हणाले की, माझा त्यांच्यासोबतचा (गौतम अदाणी) फोटो कोणीतरी ट्विट केला. मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? लगेच अदाणींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही.#ajitpawar #gautamadani #don #viral
Shinde-Fadnavis in Ayodhya: एकनाथ शिंदे-फडणवीसांचे अयोध्येत आगमन!; रॅलीमधून जोरदार शक्तीप्रदर्शन
Shinde-Fadnavis in Ayodhya: एकनाथ शिंदे-फडणवीसांचे अयोध्येत आगमन!; रॅलीमधून जोरदार शक्तीप्रदर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येमध्ये आले आहेत. यावेळी शिंदे-फडणवीसांनी अयोध्येतून रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.#eknathshinde #devendrafadnavis #aayodhya #bjp #rammadir
Ajit Pawar on Not Reachable: 'मी नॉट रिचेबल आहे, अशा बातम्या..'; अजित पवारांनी पत्रकारांनाच सुनावलं
Ajit Pawar on Not Reachable: 'मी नॉट रिचेबल आहे, अशा बातम्या..'; अजित पवारांनी पत्रकारांनाच सुनावलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या वृत्तवाहिन्यांवर काल रात्रीपासून (८ एप्रिल) दाखवल्या जात आहेत. अशातच पवार आज (९ एप्रिल) माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले.
Sharad Pawar on Adani: अदाणी प्रकरणी जेपीसी का नको?; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Sharad Pawar on Adani: अदाणी प्रकरणी जेपीसी का नको?; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदाणी प्रकरणी जेपीसी चौकशीला विरोध करत विरोधकांचेच कान टोचले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. सर्व विरोधी पक्षांनी जेपीसीला पाठिंबा दिला आहे. मात्र जेपीसीऐवजी दुसरा कोणता पर्याय उपयुक्त ठरेल यावर शरद पवार बोलले आहेत.
वेळ, तारीख लिहून ठेवा; आदित्य ठाकरेंना शीतल म्हात्रेंचं प्रतिआव्हान | Sheetal Mhatre
आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यानंतर त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी खरचं ठाण्यातून निवडणूक लढवावी. ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं त्या म्हणाल्या. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाकडून ठाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरून शीतल म्हात्रेंनी टीका केली.
फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावं; विखे पाटलांचा टोला
फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावं; विखे पाटलांचा टोला ठाण्यातील मारहाण प्रकरणानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. यावर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत.
Nitin Gadkari on Rahul Gandhi: "राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो"; नितीन गडकरींची फटकेबाजी
Nitin Gadkari on Rahul Gandhi: "राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो"; नितीन गडकरींची फटकेबाजी राहुल गांधीनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपाकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. नागपूर येथे झालेल्या गौरव यात्रेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींचे चक्क आभार मानले, राहुल गांधींमुळे आम्हाला पुन्हा सावरकरघराघरांत पोहोचवण्याची संधी मिळाली, असंच काम करत जा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यफूल महोत्सव; दर्शनासाठी भाविकांची रांग | Pune
Pune - The Ganapati immersion in the Theragaon in the artificial water tank
सावरकर, गांधींबद्दलचा 'तो' किस्सा; देवेंद्र फडणवीसांनी साधला काँग्रेसवर निशाणा | Devendra Fadnavis
महात्मा गांधीनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या बंधूंना पत्र पाठवून सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करायला सांगितलं होतं. सगळे राजकीय बंदी सोडले मलाही सोडा. मात्र सावरकरांना सोडण्यात आलं नव्हतं. गांधींनी यावर लेखही लिहला होता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला.
'अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे म्हणजे...'; मोदींच्या पदवीवरून होणाऱ्या टीकेवर चंद्रकांत पाटील आक्रमक
Lainey Wilson on Meeting The Black Crowes & Shania Twain, Performing with Alanis Morissette, Love for Meg Mcree, & More | CMT Awards 2023 Billboard
Arvind Kejriwal on Modi: 'पंतप्रधान शिक्षित आहेत की नाही...'; पदवीवरून केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल
Arvind Kejriwal on Modi: 'पंतप्रधान शिक्षित आहेत की नाही...'; पदवीवरून केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पदवीवरून सातत्याने लक्ष्य करत आहे. पंतप्रधान मोदींची वक्तव्ये अस्वस्थ करणारी आहेत. सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवण्यात येतो, असं बोलणार नाही. त्यांना विज्ञानाबाबत कोणतीही माहिती नाही, असं वाटते, असा टोला केजरीवालांनी मोदींना लगावला आहे.
गळ्यात पैशाची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचं लक्षवेधी आंदोलन | Chh Sambhaji Nagar
छत्रपती संभाजीनर येथील मंगेश साबळे या तरुण सरपंचाने फुलंब्री पंचायत समिती समोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचंच लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकार लाच मागतात, असा आरोप या सरपांचाने केला आहे. यासाठी त्याने चक्क गळ्यात २ लाख रुपयांची पैशीची माळ घालत आंदोलन केलं व ते पैसे उधळले. शेतकऱ्यांचं सरकार म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील त्याने यावेळी जाब विचारला आहे
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेंचे 'त्या' घटनेवर स्पष्टीकरण | Chandrakant Patil Ink
काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्य़क्रमासाठी आले असता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते मनोज गरबडे. मनोज गरबडे यांनी शाई का फेकली? त्या मागचा हेतू नेमका काय होता? हे सगळं जाणून घेऊयात खुद्द मनोज गरबडे यांच्याकडूनच..
Karnataka Farmer viral video: मोदींच्या फोटोकडे पाहून शेतकरी काय बोलू लागला? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल
Ram Navami 2023: Greetings, Quotes, Wishes, and Images To Share and Celebrate This Auspicious Day LatestLY
Dhangekar on Bapat: 'पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं'; बापटांच्या निधनावर धंगेकरांच्या भावना
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली, 'राजकीय स्तर कसा टिकवायचा हे बापटांकडून शिकावं. त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं' अशा भावना धंगेकरांनी व्यक्त केल्या.
राहुल गांधींच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम | Pimpari Chinchwad
काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशासह महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. पुढील आठ दिवस स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली आहे. यासह सत्याग्रह आंदोलन देखील सुरू आहे.
Eknath Shinde on Rahul Gandhi: "हा एकप्रकारे देशद्रोहच"; शिंदेंची राहुल गांधींवर बोचरी टीका
आपली खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी आपण माफी मागायला सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सावरकरांच्या अवमान प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना सुनावलं. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, अशी टीका शिंदेंनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Maha Pashudhan Expo: महापशुधन एक्स्पोत १२ कोटी रुपयांचा रेडा ठरला प्रमुख आकर्षण
Maha Pashudhan Expo: महापशुधन एक्स्पोत १२ कोटी रुपयांचा रेडा ठरला प्रमुख आकर्षण देशपातळीवरील सर्वात मोठं पशुधन एक्स्पो शिर्डीत भरवण्यात आलं असून दररोज हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित या एक्स्पोत देशभरातील विविध आठशे जातींचे पशु, पक्षी पाहायला मिळत आहेत. यावेळी हरियाणातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचं आकर्षण ठरताना दिसत आहे. या रेड्याची किंमत साधारण बारा कोटी रुपये इतकी आहे
"उद्धव ठाकरे आमच्याबद्दल चांगलं बोलतील ही अपेक्षा नाही", मुनगंटीवारांचा टोला | Sudhir Mungantiwar
उद्धव ठाकरे हे भाजपाबद्दल चांगलं बोलतील हे आता अशक्य आहे. याच जन्मी नाही, तर पुढील जन्मी देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल चांगलं बोलावं ही आता आमची अपेक्षा नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. भाजपा हा पक्ष भ्रष्ट जनता पक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली केली होती. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. पुण्याच्या आळंदीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणाऱ्या ज्ञानोबा-तुकाराम २०१९-२२ पुरस्कार सोहळ्यासाठी मुनगंटीवार उपस्थित होते.
Raj Thackeray in Pune: लहानग्याचं 'ते' चित्र; राज ठाकरेंनी आपल्या शैलीत केलं कौतुक
Raj Thackeray in Pune: लहानग्याचं 'ते' चित्र; राज ठाकरेंनी आपल्या शैलीत केलं कौतुक पुण्यातील कात्रज भागातील गुजरवाडी येथे युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमानंतर राज ठाकरे निघाले असताना सिद्धांत शेळके या मुलाने स्वतः काढलेलं एक चित्र राज ठाकरेंना दाखवलं. त्यावेळी राज ठाकरेंनी त्याच्या या चित्राचं कौतुक केलं
Congress Protest: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचं आंदोलन
Congress Protest: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचं आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भाजपाविरोधात आंदोलन केलं जात आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडलं. हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका कदम यांनी केली.
नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा | Raj Thackeray
मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटासह सत्ताधाऱ्यांचेही कान टोचले. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्याचा प्रसंग सांगितला. त्यावेळी नेमंक काय घडलं हे सांगताना राज ठाकरेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
Raj Thackeray: 'एकदा माझ्या हातात राज्याची सत्ता द्या'; गुढीपाडव्याच्या सभेत ठाकरेंचे जनतेला आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता माझ्या हातात द्या असे जनतेला आवाहनही केले. 'एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळा महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं हे चालणार नाही' असे विधान त्यांनी केले
Raj Thackeray: मशिदींवरच्या भोंग्यांवरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक; थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुन्हा मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा प्रकाशात आणला. 'आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्ह मिळालं आहे.
Raj Thackeray: 'धनुष्यबाणावर वाद सुरू झाल्यावर वेदना होत होत्या'; शिवसेनेच्या वादावर ठाकरेंचे विधान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण या वादावर आपलं स्पष्टीकरण दिलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाला फटका | Maharashtra Farmers
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाला फटका | Maharashtra Farmers कधी ऊन तर, कधी पाऊस ,तर कधी ढगाळ वातावरण अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला फटका बसला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्या नुकसानीतून पिकांना मोठा फटका बसला होता त्यातून उरलेले पीक वाचवत असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली अन् होत्याचं नव्हतं केलं.
Chandrakant Patil: 'भाजपा अनेक महिन्यापासून...'; बावनकुळेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
Chandrakant Patil: 'भाजपा अनेक महिन्यापासून...'; बावनकुळेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य भाजपा अनेक महिन्यापासून निवडणुकीची तयारी करत आहे. विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू आहे. शिवसनेच्या वाट्याला ज्या जागा जातील हे आत्तापासून ठरवण्याचे काही कारण नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल असे विधान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. संपाबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. परंतु, परीक्षार्थी आणि रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे आहे.
महेश आहेर ऑडिओ क्लिप प्रकरण; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा | Jitendra Awhad
After SVB, Credit Suisse Is in Crisis. What Went Wrong With The "Too Big To Fail" Bank?| Switzerland
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Lok
Contact Lok, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack