BaiManus
Online/Digital
महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात खास करून दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांपर्यंत अजूनही माध्यमे पोहोचली नाहीत हे वास्तव आहे. विशेषतः दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि ग्रामीण भागातील लाखो शेतकरी-शेतमजूर असे अनेक समाजातील घटक सांगता येतील. याशिवाय अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश माध्यमांचा सगळा व्यवहार हा पुरुषी आणि अभिजन असल्यासारखा आहे. पुरुषी चेहरा असलेल्या या माध्यमात विशिष्ट वर्गाच्या, जातीच्या आणि लिंगाच्याचं बातम्यांना स्थान दिलेले असते. नेहमीच बहुसंख्यांचा विचार करून बातम्यांची रचना केली जाते. यामुळेच पत्रकारांची प्रस्थापित असणारी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संवाद-माध्यमांच्या मदतीने राज्यातील सर्व घटकांतील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्या रोजच्या जगण्यापासून ते त्यांच्या आजूबाजूचा पूर्ण अवकाश त्यांच्या भाषेत व्यक्त करता यावा यासाठी वरिष्ठ पत्रकार प्रशांत पवार आणि एमजीएम विद्यापिठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाने बाईमाणूस या डिजिटल मीडिया हाऊसची निर्मित केली. कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे. Source
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | Hindi, Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
Recent Articles
Search Articlesलग्नाच्या उंबरठ्यावर प्रेम अडलं समाजाच्या दबावापुढे पिंपरी-चिंचवडच्या महिला पोलिसांची प्रेमकहाणी चर्चेत!
टीम बाईमाणूस पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांचं प्रेमप्रकरण चर्चेत, लग्नाची तयारी होऊनही ऐनवेळी सामाजिक दबावापुढे लग्न रद्द. 'राईट टू लव्ह'चा या जोडप्याला खंबीर पाठिंबा "प्रेम कोणावर करायचं, हा अधिकार समाज का ठरवतोय?" पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला पोलीस कर्मचारी एकमेकींवर प्रेम करत असून, आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली होती. एक मूळची उत्तर महाराष्ट्रातील, तर दुसरी पुण्यातील सीमावर्ती भागातील गावची आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र; भाजपा म्हणतं, ‘काँग्रेस नेतेही जबाबदार’
टीम बाईमाणूस पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील समस्यांबाबत राहुल गांधींसमोर प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधलं. राहुल गांधींच्या या पत्राला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देत त्यांच्या काही दाव्यांवर स्पष्टीकरण दिलं.
विडीच्या धुरात हरवलेलं आयुष्य… वेतनवाढ नको, हातात काम हवं!; सोलापूरच्या 30 हजार महिला विडी कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न
अप्सरा आगा सामान्यतः कामगार रस्त्यावर उतरतात ते वेतनवाढीसाठी, किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी किंवा आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून. मात्र सोलापुरात सध्या एक वेगळेच चित्र दिसत आहे. राज्य शासनाने विडी कामगारांसाठी प्रतिदिन ३७९ रुपये किमान वेतन आणि वाढीव महागाई भत्ता लागू केल्यानंतर हजारो महिला कामगार ‘आम्हाला वेतनवाढ नको, आमचा रोजगार वाचवा’ अशी मागणी घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.
‘’महंगाई डायन खाए जात है"... लोक रस्त्यावर उतरत नाहीत. जाब विचारत नाहीत म्हणूनच राज्यकर्ते निर्धास्त!
भागा वरखडे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्दिष्ट महागाई नियंत्रणात ठेवणे हेच असते. व्याजदर वाढविणे-कमी करणे, अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठ्यावर लक्ष ठेवणे, मागणी आणि कर्जवाटपाचे संतुलन साधणे अशा विविध उपायांद्वारे मध्यवर्ती बँक महागाईचा वेग रोखण्याचा प्रयत्न करते. सरकारकडूनही वेळोवेळी महागाईवर नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जातात, तरीही सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातील वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे.
देशातील ८.७ कोटी तरुण शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणाच्या बाहेर…पदवी हातात, पण नोकरीसाठी कौशल्य कुठे?
शंतनू खुजे निती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार, १५ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल ८.७ कोटी तरुण शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. दुसरीकडे, पदवीधरांची संख्या वाढत असली तरी केवळ ८.२५ टक्के पदवीधरांना त्यांच्या शिक्षणाशी सुसंगत रोजगार मिळतो. म्हणजे देशात तरुणांची कमतरता नाही, पदवीधरांचीही कमतरता नाही… कमतरता आहे ती शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांच्यातील योग्य सांगड घालणाऱ्या व्यवस्थेची.
‘जय महाकाली, आयो गोरखाली’ची गर्जना थांबणार? चार वर्षांच्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे ‘गोरखा रेजिमेंट’समोर अस्तित्वाचे संकट!
शंतनू खुजे “जय महाकाली, आयो गोरखाली!” ही गर्जना ऐकताच शत्रूच्या छातीत धडकी भरायची. दोन महायुद्धांपासून काश्मीर आणि कारगिलपर्यंत भारताच्या प्रत्येक महत्त्वाच्या लढाईत शौर्य गाजवणाऱ्या गोरखा सैनिकांचा इतिहास दोन शतकांहून अधिक गौरवशाली आहे. पण आज याच गोरख्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अग्निपथ योजनेमुळे २०२२ पासून नेपाळी तरुणांची भारतीय सैन्यातील भरती थांबली असून, दोन देशांना जोडणारी ही ऐतिहासिक लष्करी परंपराच तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे.
‘लेडी सिंघम’च्या आत्महत्येचा निकाल पाच वर्षांनी; आरोपी निर्दोष, पण दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूचे प्रश्न अनुत्तरितच!
विठ्ठल साबळे मेळघाटच्या जंगलात अतिक्रमण, अवैध वृक्षतोड आणि वन्यजीव गुन्ह्यांविरोधात आक्रमकपणे कारवाई करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर मानसिक छळ, अपमानास्पद वर्तन आणि कामाच्या दबावाचे गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर शिवकुमार यांना अटक झाली, गुन्हा दाखल झाला आणि प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली.
जेन-झी नंतर जेन-अल्फाचा एल्गार : कोवळ्या हातांच्या वज्रमुठीचे व्यवस्थेला आव्हान !
शेखर पाटील जेन-झीच्या आंदोलनामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच त्यांच्याहून लहान पिढी अर्थात शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील आपल्यापेक्षा मोठ्या ताई आणि दादांचाच मार्ग निवडत थेट रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतल्याची बाब ही लक्षणीय अशीच आहे. सोशल मीडियाचा वापर करून आता शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आपल्या हक्कांसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत असून आपण सर्वांनी याचे खुल्या दिलाने स्वागत करतांनाच अंतर्मुख होण्याची गरज आहे. यासाठी याला विविध आयामांमधून समजून घ्यावे लागणार आहे.
सचिन अंदुरे बाहेर, शरद कळसकरला जामीन, मग दाभोलकरांना मारले तरी कुणी…? 13 वर्षांनंतरही हत्या प्रकरणाचे गूढ कायम
अप्सरा आगा मुंबई उच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेची जन्मठेप स्थगित करत १८ ऑगस्ट २०२६ रोजी जामीन मंजूर केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ८ वर्षांनंतर केलेली ओळख आणि जप्त शस्त्राबाबतच्या त्रुटींमुळे अंदुरेविरोधातील पुरावे 'अत्यंत कमकुवत' असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तपासात संशयित मारेकरी बदलल्याने आणि मुख्य सूत्रधार स्पष्ट न झाल्याने, २० ऑगस्ट रोजी हत्येला १३ वर्षे पूर्ण होत असताना मुख्य मारेकरी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 'डॉ.
गणपत पाटलांचा ‘नाच्या’ आणि अस्सल ‘नाच्या’... अभिनयाची शिक्षा सगळ्यांनाच!
प्रशांत पवार मराठी चित्रपटात ‘नाच्या’ म्हटलं की आजही सर्वप्रथम आठवतात ते गणपत पाटील… डोक्यावर मखमली टोपी, अंगावर सुरवार-सदरा, कमरेला लचके देत चालणारी देहबोली आणि ‘आत्ता गं बया!’ म्हणत टाळी वाजवणारा त्यांचा खास अंदाज! पण पडद्यावर दिसणारा हा नाच्या खरोखर तमाशाच्या फडातही असाच होता का? तो खरंच तृतीयपंथी होता का? त्याचा आवाज बायकी आणि हालचाली स्त्रीसदृशच होत्या का?