Deshdoot
VerifiedNewspaper
Deshdoot (Marathi देशदूत – messenger of the country) is an Indian daily newspaper, published in the Marathi language in the northern part of Maharashtra state. It is headquartered in Nashik.
Deshdoot is the fastest growing Marathi newspaper in India. Source
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | English, Hindi, Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
| Frequency | Daily |
| Days Published | N/A |
Recent Articles
Search ArticlesAhilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत घेत निवडणुकीतील उत्सुकता वाढवली. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीनपर्यंत विक्री झालेल्या अर्जांपैकी 369 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
Ahilyanagar : शंकरराव गडाखच नेवासा सहकाराचे किंग
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा गडाख परिवाराचा सहकारातील दबदबा अधोरेखित झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, सोमवार (दि. 5) नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे या मतदारसंघातून गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. दरम्यान, गडाख यांच्या पाठोपाठ घुले परिवार यांची बिनविरोधच्या दिशेन वाटचाल आहे.
Ahilyanagar : बुधवारपासून माघारीसाठी दाढी कुरवळावी लागणार
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगरसह राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज, मंगळवार (दि. 6) छाननी होणार आहे. त्यानंतर उद्या, बुधवार (दि. 7) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. माघारीसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याने पुढील पंधरा दिवसांत इच्छुकांची मनधरणी, नेत्यांच्या गाठीभेटी आणि राजकीय गणिते जुळविण्याची धावपळ सुरू होणार आहे.
AMC : मोकाट कुत्रे 25 हजार, निवारा केंद्राची क्षमता 500!
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने पिंपळगाव माळवी येथे 500 कुत्र्यांच्या क्षमतेचे श्वान निवारा केंद्र (सेंट्रल डॉग शेल्टर होम) उभारले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उभारण्यात आलेल्या या निवारा केंद्रात पकडण्यात आलेल्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी सांभाळ केला जाणार आहे. मात्र, शहरात सुमारे 25 हजार मोकाट कुत्रे असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते.
Crime News : भिवंडीकडे जाणारा गुटख्याचा 12.81 लाखांचा साठा जप्त
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरमधून भिवंडी येथे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाणार्या पिकअप वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. नांदगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात केलेल्या या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून वाहनासह 12 लाख 81 हजार 135 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Parner : 23 कोटींच्या व्यवहारानंतर 340 कोटींचे कर्ज!
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी पुण्याचे माजी खासदार विदुरा नवले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना सुमारे 23 कोटी रुपये दिल्याची कबुली पुण्यातील पंचशील समूहाचे बांधकाम उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांनी पोलीस चौकशीत दिल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे वकील तथा फिर्यादी रामदास घावटे यांनी दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी पारनेर पोलिसांनी गेल्या आठवड्यात अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांना नोटीस बजावली होती.
Shrigonda : निमगाव खलूतील घरफोडीने श्रीगोंदा हादरला
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda तालुक्यातील निमगाव खलू शिवारातील शेतघरात 5 ते 6 अज्ञात चोरट्यांनी घुसून वृद्ध दाम्पत्यावर घातक हत्यारांनी हल्ला केला. यात मंगलबाई शिवाजी भोईटे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती शिवाजी परशुराम भोईटे गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी सुमारे 6 लाख 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. फिर्यादी महेंद्र शिवाजी भोईटे यांना त्यांचे बंधू सुनिल भोईटे यांनी घर बंद असल्याची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले.
Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय हा भाव
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 211 ते 375 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 रुपये ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 71 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला. गव्हाची 27 क्विंटलची आवक झाली.
Devendra Fadnavis : मतदार यादीची सखोल पडताळणी आवश्यक; CM फडणवीसांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai विरोधी पक्षाने मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिम रद्द करण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एसआयआरचे समर्थन केले आहे. नवीन पात्र मतदारांची भर, मृत्यू, स्थलांतर आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेली नोंदणी या कारणाने मतदार याद्यांमध्ये बदल होत राहतात. त्यामुळे मतदार यादीची वेळोवेळी सखोल पडताळणी आवश्यक ठरत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Nashik Accident News : येवला-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
येवला | प्रतिनिधी | Yeola येवला-नांदगाव राज्यमार्गावर (Yeola-Nandgaon Road) सोमवारी, (दि. ५) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू (Death) झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मालवाहतूक आयशर आदळली. या अपघातात आयशर चालक श्रीकांत चव्हाण (रा. लातूर) यांचा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी मनोज राठोड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.