मुंबई । Mumbai सध्या मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच, दुसरीकडे मनोरंजन विश्वात मात्र बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. आमिर खान आणि त्याची जुनी मैत्रीण गौरी स्प्रॅट यांनी अत्यंत साधेपणाने राहत्या घरी ‘रजिस्टर मॅरेज’ करत आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. या अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक विवाह सोहळ्याचे फोटो आता समोर आले असून सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल होत आहेत.