हिंदुस्थानसाठी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आजचा दिवस आनंददायी ठरला. एकिकडे रक्षिता रामराजने ऑलिम्पिक चॅम्पियनला धूळ चारली, तर दुसरीकडे किदम्बी श्रीकांतने पिछाडीवरून पुमनारमन करत दमदार विजय साकारला. लक्ष्य सेनने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असून सात्त्विक-चिराग यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हिंदुस्थानच्या रक्षिताने चीनच्या चेन यु फेईला सरळ गेममध्ये पराभूत करून सर्वांना धक्का दिला.
Saamana
Newspaper
Saamana (Hindi/Marathi: सामना Sāmnā) is a Marathi-language newspaper published in Maharashtra, India. The paper was launched on 23 January 1988 by Bal Thackeray, the founder of the Shiv Sena, a right-wing political party in Maharashtra. A Hindi version of the paper, Dopahar Ka Saamana, was launched on 23 February 1993. Source
Actions
Media Outlet details
| Scope | Local |
|---|---|
| Language | Hindi, Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
Recent Articles
Search Articlesव्यायाम संस्कृतीचा आधारस्तंभ हरपला; शरीरसौष्ठव मार्गदर्शक लक्ष्मण बोवलेकर यांचे निधन
मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात अनेक पीळदार शरीरयष्टी घडविणारे आणि व्यायाम संस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण बोवलेकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शरीरसौष्ठव क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ हरपला आहे. बोवलेकर हे केवळ व्यायामशाळेचे संचालक नव्हते, तर शरीरसौष्ठवाची चळवळ तळागाळात रुजवणारे कार्यकर्ते होते. मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी या खेळाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले.
उपनगरची जिल्हा अजिंक्यपद कबड्डी आजपासून
ज्या स्पर्धेत चढाया-पकडींचा खेळ पाहून खेळाडूंची जिल्हा संघटनेत निवड केली जाते ती मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची 44 वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. शिवसेना शाखा क्र. 123 आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धा होणार आहे. विक्रोळीच्या पार्कसाईट येथील कैलास संकुलातील पालिका मैदानावर रंगणाऱ्या या स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष, द्वितीय श्रेणी पुरुष, महिला आणि पुरुष व्यावसायिक गटांतील संघ आपले कौशल्य पणाला लावतील.
टीम इंडियाचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, पहिल्या हॉकी सामन्यात यजमानांवर 3-2 ने बाजी
हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडवर 3-2 गोल फरकाने मात करीत विजयारंभ केला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेतील 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडने आक्रमक खेळ करत हिंदुस्थानवर दबाव निर्माण केला. जोंटी एल्म्सने 25 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत यजमानांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, मात्र हिंदुस्थानने लगेचच प्रत्युत्तर दिले. उत्तम सिंहने त्याच 25 व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
हिंदुस्थानने उडवला मलेशियाचा धुव्वा
हिंदुस्थानने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मलेशियाचा 4-1 असा धुव्वा उडवत विजयाची बोहनी केली. हिंदुस्थानने पिछाडीवरून असे दणक्यात पुनरागमन केले की, मलेशियाला त्यांच्यासमोर गुडघे टेकावे लागले. मलेशियासाठी नुरमिराह झुल्किफलीने सामन्यातील पहिला गोल केला. पण हिंदुस्थानचा संघ हार मानणारा नव्हता. त्यानंतर काही वेळातच मुमताज खानने हिंदुस्थानसाठी पहिला गोल केला. हिंदुस्थानची कर्णधार सलीमा टेटेने त्यानंतर जोरदार आक्रमण केले आणि संघासाठी दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली.
राजेंद्र भिंगे खून प्रकरण – गुजरातमधून तिघांना केली अटक, गुन्ह्यात पाच जणांचा समावेश
राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ४३) यांचा राहत्या घराजवळ गोळ्या घालून खून केल्यानंतर पसार झालेल्या तिघांना अहमदाबाद – गुजरात येथून पोलिसांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी दोन जणांना अटक केली असल्याने एकूण संशयित आरोपींची संख्या पाचवर गेली आहे. दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भिंगे हे जेवण करून घराजवळ शतपावली करीत असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी गोळ्या घालून त्यांचा खून केला होता.
चतूर चहलची विक्रमी कामगिरी; असा पराक्रम करणारा हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज
हिंदुस्थानचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल टीम इंडियातून बाहेर असला तरी त्याच्या गोलंदाजीचा जलवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 मध्ये हरयाणाकडून खेळताना तमिळनाडूविरुद्ध त्याने घातक गोलंदाजी करत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी त्याला एका विकेटची आवश्यकता होती. मात्र, चहलने आपल्या फिरकीच्या जाळ्यात तीन फलंदाजांना अडकवलं आणि 400 विकेट घेणारा हिंदुस्थानचा पहिला गोलंदाज ठरण्याचा मान पटकावला.
टोरंट कंपनीवर राज्य सरकार मेहरबान! कर्जतमध्ये केंद्राच्या मंजुरीपेक्षा दुप्पट जमीन खरेदीला परवानगी, गावांच्या यादीतही केला बदल
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उभारण्यात येणाऱ्या टोरंट एनर्जीच्या ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी टोरंट एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तब्बल २९५ हेक्टर म्हणजेच सुमारे ७३० एकर खासगी शेतजमीन खरेदी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मूळ मंजुरीत नमूद केलेल्या खासगी जमिनीच्या तुलनेत ही जमीन दुपटीहून अधिक आहे.
अलिबाग न्यायालयाचा दणका, भाजप आमदारासह 4 जणांना सुनावली 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
भाजप आमदार महेश बालदी यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 2010 मधील एका प्रकरणात आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 16 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. मात्र, शिक्षा होऊनही सर्व चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आरोपींना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच सत्र न्यायालयाने दिलेल्या या निकालावर जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
महायुतीची सत्ता येताच गोकुळचे दूध सहा रुपयांनी महागले, शनिवारपासून नवीन दर लागू
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, तर खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार असणार आहे. गोकुळच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.