Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Sachin Fulpagare
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळू दे, ७२ किमी पायी दिंडी करत कार्यर्त्यांचं देवीला साकडं
अहमदनगर : नव्याने स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावं यासाठी बीड येथील भाजपच्या महिला आघाडीने पदयात्रा करत मोहटा देवी गडावर येऊन देवीला साकडं घातलं. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावं, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना आहे.
'राज्यातलं सरकार राहिलं काय अन् न राहिलं काय...', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्य
इंदापूर, पुणे : राज्यात दोन वर्षे करोनाचा काळ होता. आता त्यानंतर काही चांगले काम करता येईल, असे वाटले होते. मात्र आता काहीही घडू शकते, असे म्हणत राज्य सरकार बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये सूचक वक्तव्य केले आहे. सरकार राहिले काय व न राहिले काय? शेवटी तुमच्या तालुक्याचा आमदार मीच आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचं संपूर्ण भाषण हे सत्ता जाण्यापूर्वीचं सांत्वनपर भाषण असल्याचेच दिसून आले. राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत.
९६वे साहित्य संमेलन वर्ध्याला, अखिल भारतीय साहित्य महामंडळाची घोषणा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या आयोजनाचा मान विदर्भाला मिळाला आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालय परिसरात वि. सा. संघाच्या वतीने हे संमेलन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी वि. सा. संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. वर्धा शहराला संमेलनाच्या आयोजनाचा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे.
अंजनेरी नव्हे, किष्किंधानगरी हनुमानाचे जन्मस्थान; स्वामी गोविंदानंद सरस्वतींचा दावा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नव्हे, तर कर्नाटकमधील किष्किंधानगरी आहे. वाल्मीकी रामायणातील श्लोकांचा आधार घेत स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी हा दावा केला आहे. हनुमान जन्मस्थान ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवसांपासून मुक्कामी असून, हनुमानाचे जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे सिद्ध करण्यासाठी ते धर्मरथ घेऊन भारतभर यात्रा करीत आहेत. तिरुपती देवस्थाननेही हनुमान जन्मस्थळावर दावा केला होता.
सावरकर हा सूर्य कधी मावळणार नाही, अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : 'स्वातंत्र्यानंतर सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची 'गल्ली ते दिल्ली' सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही,' असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी शनिवारी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त स्वा.
...मग संभाजीराजेंना शिवसेनेतून लढायला काय हरकत होती?, अरविंद सावंतांचा सवाल
नाशिक : राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजे छत्रपतींना लक्ष्य केलं आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी, मनसेचे शिष्टमंडळ लवकरच अयोध्येत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. मनसेच्या भोंगेविरोधी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला नसला, तरी अयोध्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी नियोजनात काटेकोरपणा आणला जात आहे. यासाठी मनसेचे एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांकडून देण्यात आली. राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
एक कविता एकाकी मिटली..., ज्येष्ठ कवयित्री रजनी परुळेकर यांचे निधन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मानवी मनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या, जीवनविचारी कविता लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री रजनी परुळेकर यांचे बुधवारी मध्यरात्री गिरगाव येथील राहत्या घरी झोपेतच निधन झाले. गेली काही वर्षे त्या मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनामुळे एक मृदुभाषी कवयित्री मराठी साहित्यविश्वाने गमावल्याची... एक अंतर्मुख कविता एकाकी मिटल्याची खंत व्यक्त झाली. परुळेकर यांच्या आयुष्याची संध्याकाळ खूपच विपन्नावस्थेत आणि दुर्लक्षित अवस्थेत गेल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली.
मंदिरांबरोबर इतरांनाही परवानगी आवश्यक, २४-२५ मंदिरांचाच परवानगी अर्ज
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटींवर मुंबईतील मशिदींनी परवानगी घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांनाही लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेणे आवश्यक बनले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी बुधवारी यासंदर्भात मुंबईतील सर्व धर्मगुरू, मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार यांच्या ट्रस्टींची बैठक घेतली. लाऊडस्पीकर लावून प्रार्थना करायची असेल, तर परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने यावेळी सर्वांना करण्यात आले.
संघर्ष नव्हे; संधी!
धावते जग संघर्ष नव्हे; संधी! हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अजय देवगण व लोकप्रिय कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांच्यात ट्विटरवर झालेल्या 'बोलाचाली'तून या भाषिक संघर्षाचे काही नवे पैलू समोर आले. दक्षिणेतील मसाला चित्रपटांना दक्षिणेबाहेरील प्रदेशातही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकेकाळी सबटायटल्स अथवा 'उपशीर्षके' हा आस्वादनात अडथळा ठरत असे, 'डबिंग' केल्यास त्याचा दर्जा चांगला नसे अथवा केवळ शृंगारिक चित्रपट डब होत. बाहुबली, आरआरआर, पुष्पा आणि केजीएफ या चित्रपटांनी ही कुंपणे ओलांडली.
वेगळ्या वाटेचा अभिनेता
चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते सलीम घौस यांच्या निधनामुळे, एका अष्टपैलू अभिनेत्याने 'एक्झिट' घेतली आहे. अभिनेते, दिग्दर्शक, मार्शल आर्टसचे अभ्यासक आणि शेफ अशा वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 'तुमचा व्यवसायच तुम्हाला निवडतो,' या एकाच वाक्यात त्यांनी केलेले वर्णन त्यांच्या कारकीर्दीने सार्थ ठरविले. शाळेत नाटुकले, काव्यवाचनामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली आणि पुढे तोच त्यांचा व्यवसाय झाला. त्यांचा जन्म चेन्नईतील.
श्रीमंत मृत्यू नको..!
श्रीकांत बोजेवार काही गोष्टी आपल्याला भिंतीवरील सुविचारांपुरत्याच ठेवायच्या असतात. 'इदं न मम' चे सत्य, 'एक दिन ऐसा आयेगा, मैं रौदूंगी तोय' असं सांगणारी माती किंवा 'खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा' हे सत्य सांगणारे शब्द आपल्याला तेवढ्यापुरते अंतर्मुख करतात, परंतु काही क्षणानंतर आपण व्यवहारात गुंतून जातो, आपले जे काही आहे ते आपल्या मुलाबाळांचेच आहे या स्वाभाविक मानवी प्रवृत्तीला शरण जातो.
जगालाच मानसोपचार समुपदेशनाची गरज, पदग्रहण सोळ्यात डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : आता लोक खूप आत्मकेंद्रित झाले आहेत आणि त्यांनी स्वतःला वैयक्तिक चौकटीत बंद केले आहे. त्यामुळे संपूर्ण जगालाच सामाजिक वर्तन बदलण्यासाठी मानसोपचार समुपदेशनाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. मानसोपचार तज्ज्ञ संघटना नागपूर शाखेच्या हॉटेल सेंटर पॉइंट येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मानसोपचाराची गरज फक्त शहरी भागातच आहे असे समजण्याचे कारण नाही, असे सांगून डॉ.
'बॉक्स ऑफिस'चा बादशहा
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 21, 2022, 7:47 AM ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक तातिनेनी तथा टी. रामाराव यांच्या निधनामुळे हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. ३४ वर्षांत तब्बल ७० चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करणारे रामाराव यांचे बहुतांश चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजले.... ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक तातिनेनी तथा टी. रामाराव यांच्या निधनामुळे हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
काँग्रेसची ‘किशोरा’वस्था!
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 21, 2022, 7:24 AM निवडणूक नियोजक आणि व्यवस्थापक या नात्याने प्रशांत किशोर हे प्रचारकाम करू लागले, त्याला एक दशक झाले. या काळात त्यांनी विविध पक्षांना आठ विजय मिळवून दिले, असे म्हणतात.... काँग्रेसची ‘किशोरा’वस्था! निवडणूक नियोजक आणि व्यवस्थापक या नात्याने प्रशांत किशोर हे प्रचारकाम करू लागले, त्याला एक दशक झाले. या काळात त्यांनी विविध पक्षांना आठ विजय मिळवून दिले, असे म्हणतात.
चुकलेले अंदाज
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 21, 2022, 7:37 AM हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला असेल, तर बिनधास्त छत्री न घेता जा, असा विनोद पूर्वी असे. मोसमी पावसाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर आधारित प्रतिमान (मॉडेल) आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या साह्याने संपूर्ण हंगामाचा अंदाज... हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला असेल, तर बिनधास्त छत्री न घेता जा, असा विनोद पूर्वी असे.
विजेच्या प्रश्नावरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 21, 2022, 7:02 AM उन्हाळा सुरू असल्याने राज्यात विजेची मागणी वाढली आहे. पण विजेची तूट वाढत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी छुपे भारनियमन केले जात आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजेच्या प्रश्नावरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : 'महावितरण'कडून वीज वितरित होणाऱ्या क्षेत्रामध्ये आजही भारनियमनाचे चटके कायम आहेत.
सावधान! करोनाचे रुग्ण पुन्ह वाढू लागले, आरोग्यमंत्री बोलले...
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 21, 2022, 6:36 AM करोनाचा संसर्ग कमी झाल्याने मास्कची सक्ती हटवण्यात आली आहे. पण आता पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी जनतेला मोठे आवाहन केले आहे. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : 'पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी महाराष्ट्रात साथरोगाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे तूर्तास मास्क अनिवार्य करण्यात आलेला नाही.
राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर मनसेच्या शहर सचिवाचा मोठा निर्णय
परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवावे अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असे वक्तव्य केले आहे. यामुळे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे पडसाद परभणीच्या गंगाखेडमध्ये उमटले आहेत. मनसेचे शहर सचिव महेमूद शेख यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
ब्रह्मगिरीवर आता प्लास्टिक नेण्यास मनाई, वन विभागाचे आदेश जारी
saurabh.bendale@timesgroup.com Tweet : SaurabhbMT नाशिक : वन्यजीवांच्या प्रकृती स्वास्थ्यासह जंगल समृद्धीसाठी ब्रह्मगिरीला प्रदूषणाच्या जंजाळ्यातून दूर करण्याचा निर्णय झाला आहे. प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी करण्याचा निर्धार वन विभागाने केला आहे. त्यासंदर्भातील आदेश उपवनसंरक्षकांनी निर्गमित केले असून, या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापुढे ब्रह्मगिरीवर कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नेण्यास परवानगी नाही. मात्र, त्याचवेळी स्थानिकांच्या रोजगाराबाबतही सतर्कता बाळगली जाणार आहे.
धक्कादायक! कल्याणमध्ये ९० कोटींची जीएसटी चोरी, दोघांना अटक; 'असा' केला घोटाळा
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 20, 2022, 9:30 AM कर चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास ९० कोटींच्या जीएसटीची चोरी झाल्याचं प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आर्थिक कुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धक्कादायक! कल्याणमध्ये ९० कोटींची जीएसटी चोरी, दोघांना अटक; 'असा' केला घोटाळा म. टा.
असे 'बालगंधर्व' आता न(वे) होणे...
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 20, 2022, 8:51 AM पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. पुणेकरांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या विषयाची हाताळणी तेवढ्याच संवेदनशीलतेने, उत्तम अभिरुचीने आणि सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीने होणे गरजेचे आहे. असे 'बालगंधर्व' आता न(वे) होणे... श्रीपाद ब्रह्मे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.
सर्वोच्च दणका
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 20, 2022, 8:16 AM 'कायद्यासमोर सर्व समान असतात, पण काही जण अधिक समान असतात', असे जॉर्ज ऑर्वेलने ७५ वर्षांपूर्वीच लिहून ठेवले असले तरी, अलीकडे या वाक्याची आठवण व्हावी असे प्रसंग घडत असतात....... 'कायद्यासमोर सर्व समान असतात, पण काही जण अधिक समान असतात', असे जॉर्ज ऑर्वेलने ७५ वर्षांपूर्वीच लिहून ठेवले असले तरी, अलीकडे या वाक्याची आठवण व्हावी असे प्रसंग घडत असतात.
'पराक्रम'सिद्ध
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Apr 20, 2022, 8:27 AM लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुखपदी झालेली निवड मराठी जनांना ती अधिक सुखावणारी आहे. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यापाठोपाठ हा बहुमान महाराष्ट्राच्या वाट्याला येतो आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुखपदी झालेली निवड मराठी जनांना ती अधिक सुखावणारी आहे. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यापाठोपाठ हा बहुमान महाराष्ट्राच्या वाट्याला येतो आहे.
नागपूरकरांचे घरांचे स्वप्न होणार पूर्ण, 'नासुप्र'चा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Mar 31, 2022, 9:05 AM घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्ह आहेत. नागपूर सुधार प्रन्यासला ९२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये घरकुल प्रकल्पासह खेळांच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरकरांचे घरांचे स्वप्न होणार पूर्ण, 'नासुप्र'चा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बरखास्तीच्या निर्णयानंतर पुनरुज्जीवन झालेल्या नासुप्रला आता आर्थिक बळ मिळाले आहे.
woman fights leopard : थरारक घटना! धाडसी महिलेची झुंज, बिबट्याच्या जबड्यातून पतीला वाचवले
अहमदनगर: बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या पतीला बघून पत्नी मोठे ( woman fights leopard ) धाडस दाखवले. पतीला सोडवण्यासाठी तिने बिबट्यावर जोरदार हल्ला चढवला. तिने बिबट्याला अक्षरशः लाथा आणि बुक्यांनी तुडवले आणि पतीची सुटका केली. ही घटना पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा येथे घडली. संजना पावडे असं या धाडसी महिलेचं ( woman fights leopard saves husband life ) नाव आहे. तर महिलेचे पती गोरख पावडे हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अशी घडली घटना...
Nitin Raut Cancelled His Meeting With Unions Representing Staffers Of Government Run Power Companies
मुंबई : वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण होणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी होणारी बैठक ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अचानक सोमवारी रात्री रद्द केली. चर्चेद्वारे हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊनही संप मागे न घेतल्याने संतापून ऊर्जामंत्र्यांनी हे पाऊल उचलले. 'राज्य सरकार कुठल्याही वीज कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही,' असे ऊर्जामंत्र्यांनी सोमवारी सकाळी स्पष्ट केले. त्यामुळेच वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी मंगळवारी दुपारी दोन वाजता मंत्रालयात सकारात्मक चर्चा केली जाईल.
मुंबईत घर मागणाऱ्या शिवसेना आमदाराविरोधात राष्ट्रवादीचे भीक मागो आंदोलन
औरंगाबाद : मुंबईत आमदारांना घर देण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईत घर मागणाऱ्या एका शिवसेना आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ( ncp protest against shiv sena mla ) आक्रमक भूमिका घेतली आहे. कन्नड तालुक्याचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत ( shiv sena mla udaysingh rajput ) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विधानसभेत राजपूत यांनी आमदारांना घर देण्याची मागणी केली होती.
kapil sibal : 'काहींना घरची काँग्रेस बनवायची आहे', कपिल सिब्बल बरसले
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 15, 2022, 10:51 AM उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. उत्तर प्रदेशात तर काँग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ताच गेली. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पराभवावर चर्चा करण्यात आली. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केला आहे.
prashant kishor : निवडणूक निकालानंतर प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'साहेबांना माहिती आहे....'
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 11, 2022, 5:01 PM विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाल्याने भाजपमध्ये उत्साह आहे. आता पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांनी अहमदाबादमध्ये आज रोड शो ही केला. दुसरीकडे निवडणुकीच्या निकालाने विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. खास करून काँग्रेसने मोठे नुकसान झाले आहे. अशातच निवडणूक रणनीतीकार प्रशांकत किशोर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य विरोधकांना दिलासा देणारं आहे.
ओडिशात ड्रग माफियावर मोठी कारवाई, महाराष्ट्राशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय
भुवनेश्वर : ओडिशाच्या क्राइम ब्रँचच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) NDPS कायदा, १९८५ अंतर्गत वाँटेड ड्रग माफिया अनिल पांडीची २ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यासाठी ( drug mafia anil kumar pandi ) प्राधिकारणाचे सक्षम अधिकारी नेमले केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करातून बेकायदेशीरपणे मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याची कारवाई कोडाला येथे करण्यात येईल, असे STF ने ट्विटमध्ये म्हटले आहे. यात स्विमिंग पूल, ३३ भूखंडांसह एक इमारतीचाही समावेश आहे.
russia ukraine war : भारतासाठी रशिया ६ तास युद्ध रोखण्यास तयार? सोशल मीडियातून दावा
russia ukraine news : खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ( russia ukraine war ) युक्रेनच्या सैन्याने मानवी ढाल बनवल्याच्या आरोप रशियाने केला होता. यादरम्यान भारतातील जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना खारकीव्हपासून युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील काही ट्विटमधून हा दावा करण्यात आला आहे.
indians in ukraine : यक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती; परतलेल्या विद्यार्थ्याने म्हटले, 'घराबाहेर ३ स्फोट झाले...'
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 3, 2022, 12:09 PM युक्रेनमध्ये कीव्ह आणि खारकीव्हमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. युद्धामुळे दोन्ही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे, अशी माहिती युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली आहे. तसंच युक्रेनमधून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल सरकारचे विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. तर काही विद्यार्थ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
indian embassy in ukraine : युक्रेनमधील भारतीय दुतावासाची सूचना, 'तातडीने खारकीव्ह सोडा आणि...'
कीव्ह : रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून ( indian embassy in ukraine ) आहेत. खासकरून युक्रेनच्या खारकीव्ह मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. खारकीव्हमध्ये तीन हजारांवर ( advisory to indian nationals in kharkiv ) भारतीय विद्यार्थी अडकल्याचं सांगण्यात येत आहे. रशियाने खारकीव्हमध्ये केलेल्या हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्या खारकीव्हच्या मोठ्या भागावार ताबा घेतल्याचं बोललं जातंय.
jyotiraditya scindia : युक्रेनमधील महाराष्ट्राच्या मुलांना ज्योतिरादित्य म्हणाले, 'घरच्यांना सांगा, मराठा माणूस आलाय'
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 2, 2022, 2:17 PM युक्रेनमध्ये अडकलेल्या आणि रोमानियात सुरक्षित आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे भेटले. बुखारेस्टमधील विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानतळावरूनच विमानाद्वारे विद्यार्थ्यांना भारतात रवाना केले जात आहे. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
russia ukraine war : भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्युने धक्का; PM मोदी युरोपियन नेत्यांना म्हणाले...
नवी दिल्ली : युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे उद्भवलेल्या संकटावर ( pm modi talks with european leaders ) पंतप्रधान मोदींनी अनेक युरोपीय नेत्यांशी चर्चा केली आणि यादरम्यान त्यांनी युक्रेनमध्ये ( russia ukraine war ) सुरू असलेले युद्ध आणि बिघडत चाललेल्या मानवतावादी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने ( पीएमओ ) यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.
indian evacuation from ukraine : युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात कसं आणणार? परराष्ट्र सचिवांनी सांगितले...
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 1, 2022, 10:47 PM युक्रेनमध्ये अजूनही शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. शेकडो विद्यार्थी रोमानिया, हंगेरीत आहेत. त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता परराष्ट्र सचिव श्रृंगला यांनी मोठी माहिती दिली आहे. पुढच्या तीन दिवसांत जवळपास सर्व भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात कसं आणणार? परराष्ट्र सचिवांनी सांगितले...
PM मोदींचा नवीनच्या वडिलांना फोन, युक्रेनच्या खारकीव्हमध्ये ३ हजार विद्यार्थी अडकले
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 1, 2022, 6:13 PM युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना आजच कीव्ह सोडण्याची सूचना देत अलर्ट जारी केला. अशातच एक भारतासाठी एक वाईट बातमी आली. युक्रेनच्या खारकीव्ह शहरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे तिथे अडकलेल्या भारतीयांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
russia ukraine war : युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 1, 2022, 3:34 PM युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून रशियाचे बॉम्ब हल्ले सुरू आहेत. युक्रेनच्या मोठ्या शहरांवर रशियाकडून हे हल्ले करण्यात येत आहेत. आता युक्रेनच्या खारकीव्हमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे.
ukraine news : 'भारतीयांनो... तातडीने कीव्ह सोडा', राजदुतांची सूचना; रशिया संहारक हल्ल्याच्या तयारीत
कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धाने परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. आक्रमक झालेल्या रशियाने युक्रेनवर हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अशात भारतीय दुतावासाने युक्रेनमधील ( embassy of india in ukraine ) आपल्या सर्व नागरिकांना अत्यंत मोठी आणि महत्त्वाची सूचना केली आहे. सर्व भारतीयांनी कीव्हमधून ( indian students in ukraine ) तताडीने आजच्या आजच बाहेर पडावं, असे निर्देश कीव्हमधील भारतीय दुतावासाने दिले आहेत.
ukraine news : 'ट्रेनमधून आम्हाला बाहेर फेकताहेत, लाठीमार होतोय', विद्यार्थिनीने दाखवली भयंकर परिस्थिती
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 1, 2022, 12:23 PM रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमध्ये भीषण स्थिती आहे. शेकडो भारतीय विद्यार्थी तिथे अडकले आहेत. त्यांना मायदेशात सुरक्षित आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता कीव्ह रेल्वे येथे विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचं तिथे अडकलेले विद्यार्थी सांगत आहेत.
delhi riots : सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींसह २० जणांना हायकोर्टाची नोटीस, विचारले...
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Feb 28, 2022, 4:57 PM दिल्ली दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण २० जणांना नोटीस बवाजली आहे. यात राजकीय नेत्यांसह अनेक जणांचा समावेश आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्ली दंगल: सोनिया, राहुल आणि प्रियांकांसह २० जणांना हायकोर्टाची नोटीस, विचारले... नवी दिल्ली : दिल्ली दंगलीप्रकरणी उच्च न्यायालयाने ( delhi riots ) मोठी कारवाई केली आहे.
जय हिंद!... म्हणत एअर इंडियाने मनं जिंकली!, युक्रेन मोहीमेवर केलेले ट्विट व्हायरल
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी एअर इंडिया ( air india tweet on ukraine mission ) धावली आहे. युक्रेन भारतीयांना सुखरूप बाहेर काढून रोमानिया आणि हंगेरीतून विमानाने रवाना ( Russia Ukraine News ) करण्यात येत आहे. यात एअर इंडिया मोठी भूमिका बजावत आहे. मुंबईतून आज पहाटे उड्डाण केलेल्या एअर इंडियाचे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले. एअर इंडियाचे हे विमान २०० हून अधिक भारतीयांना घेऊन मुंबईला रवानाही झाले आहेत. याची माहिती स्वतः भारताचे परराष्ट्र मंत्री एस.
ukraine russia news : युक्रेनची महिला रशियन सैनिकाला भिडली!, 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल
Sachin Fulpagare | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Feb 26, 2022, 2:54 PM युक्रेनमध्ये रशियान सैनिक घुसले आहेत. युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर रशियन सैनिकांना ताबा मिळवला आहे. अशातच युक्रेनमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये युक्रेनची एक महिला रशियन सैनिकाशी बोलताना दिसते आहे. युक्रेनची महिला रशियन सैनिकाला भिडली! व्हिडिओ होतोय व्हायरल किव्ह : युक्रेनमधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ( ukraine russia news ) शेअर होतोय.
russia slams us : 'भारतावर कोसळू शकते आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र...', रशियाने अमेरिकेला फटकारले
मॉस्को : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत युद्ध सुरूआहे. रशियाच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेने कडक निर्बंध लादले ( russia slams us ) आहेत. यावरून रशियाने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर परिणाम होऊ शकतो, असे रशियाने म्हटले आहे. रशियाची अंतराळ संशोधन संस्था रॉसकोसमॉसच्या (russian space agency roscosmos ) प्रमुखांनी ट्विट करत अमेरिकेला इशारा दिला आहे.
russia ukraine news : युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी मुंबईतून विमानाचे उड्डाण, पुतीन यांचे सुरक्षेचे आश्वासन
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाचे सैन्य युक्रेनची ( Russia Ukraine War ) राजधानी कीव्हजवळ पोहोचले आहे. रशियाकडून सतत बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. तर काही इमारतींच्या तळघरात अडकले आहेत. त्यांना खाण्यापिण्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. एअर इंडियाने शुक्रवारी रात्री एक ट्विट केलं होतं.
russia ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध; PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, राजनाथ सिंह म्हणाले...
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युद्ध भडकले ( russia ukraine war ) आहे. दोन्ही देशांचे जवळपास १०० सैनिक मारले गेले आहेत. युद्धामुळे परिस्थिती चिघळत चालली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतावर होणाऱ्या आर्थिक परिणामांचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
aditya thackeray : नवाब मलिकांच्या अटकेवरून आदित्य ठाकरे यूपीत भाजपवर बरसले, 'आम्ही कारवाईला... '
डुमरियागंज : शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यात डुमरियागंज मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी सभेला संबोधित केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी यूपी आणि केंद्राताली सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं निव्वळ स्वप्नचं ठरली आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
russia ukraine war : रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, १८ हजार भारतीय अडकल्याने चिंतेचे काहूर उठले
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील ( russia ukraine war ) सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून ज्या भारतीय कुटुंबांची मुले-मुली तिथे अडकली आहेत, ती घाबरली आहेत. युक्रेनमध्ये अजूनही १८,००० हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे.
nitish kumar : नवाब मलिकांच्या 'त्या' वक्तव्यावर नितीशकुमार म्हणाले, 'आश्चर्य आहे...'
पाटणा : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विरोधी पक्षांकडून बिहारचे मुख्यमंत्री आणि 'जेडीयू' नेते नितीशकुमार ( nitish kumar ) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे. आपल्या मनात राष्ट्रपतीपदाबाबत ( Presidential Election ) कुठलीही आकांक्षा नाहीए, असं नितीशकुमार म्हणाले.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Sachin
Contact Sachin, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack