चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad By Election) आता महाविकास आघाडीकडून (MahaVikasAaghadi) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने (NCP) नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयावर राहुल कलाटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.