Edited by: चेतन पाटील•Authored by: दीपक पडकर|Lipi•9 Jul 2026, 9:36 pm IST पोलीस भरतीचे आमिष दाखवून पीडितेला जबरदस्ती करुन तिच्यावर अत्याचार करण्याच्या आरोप प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती आहे. (फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे.