Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Kasaba By-Election
BLOG: कसब्याच्या इतिहासात दडलंय कसब्याचं राजकीय वर्तमान...
Kasaba By-election : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे विष्णू चितळे 1957 ला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून 1957 ला निवडून आले. त्यावेळी जोमात असलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा त्यांना पाठिंबा होता. संस्कृत पंडित असलेल्या विष्णू उर्फ भाई चितळेंनी उभी हयात स्वातंत्र्य संग्रामात लढण्यात घालवली होती.
Kasaba By-election : कसाब पोटनिवडणूक, भाजपचं गणित कुठं फिस्कटलं?
Kasaba By-election : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे विष्णू चितळे 1957 ला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून 1957 ला निवडणून आले. त्यावेळी जोमात असलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा त्यांना पाठिंबा होता. संस्कृत पंडित असलेल्या विष्णू उर्फ भाई चितळेंनी उभी हयात स्वातंत्र्य संग्रामात लढण्यात घालवली होती.
Sharad Pawar : 'या' कारणामुळे कसब्यात झाला भाजपचा पराभव; काय म्हणाले शरद पवार?
आज कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भाजपचा कसबा पेठमधील पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे झाला." तसेच, ते म्हणाले की, "या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी कामे केली.
Uddhav Thackeray : "कसबा भ्रमातून बाहेर निघाला तसा..."; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
आज महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव केला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba ByElection) ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपचे हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीदेखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. यावेळी ते म्हणाले की, "कसबा भ्रमातून बाहेर पडला, तसा देशही या भ्रमातून बाहेर पडायला वेळ लागणार नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले.
Abhijit Bichukale : विजय महाविकास आघाडीचा, चर्चा मात्र 'बिग बॉस' फेम अभिजित बिचूकलेंची
कसबा पेठ (Kasaba ByElection) पोटनिवणुकीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, यादरम्यान आणखी एक चर्चा रंगली होती, ती म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहिलेले अभिजित बिचूकले (Abhijit Bichukale) यांची. पोटनिवडणुकीआधी त्यांनी दावा केला होता की, "मी या मतदारसंघात राहणार असल्यामुळे इथली जनता मलाच निवडणून देणार आहे.
Kasaba ByElection : "पैशांचा पाऊस थांबला आणि..." ; विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया
आज कसबा पेठ मतदारसंघात (Kasaba ByElection) महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा ऐतिहासिक विजय झाला. तब्बल २८ वर्षांनंतर कसब्याला भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा आमदार लाभला आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र यावेळी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल ११,०४० मतांनी पराभव केला. यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, "पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडतो आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Kasaba : कसबा पेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकरांचा विजय; भाजपला मोठा धक्का
आज पुणे पोटनिवडणुकीच्या (Kasaba ByElection) निकाल लागणार असून सध्या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जाणारा कसबा (Kasaba) पेठ मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे १५व्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती.
आधी प्रचार, आता बजावला मतदानाचा हक्क; पुन्हा एकदा गिरीश बापट चर्चेत
भाजपने कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरवले आणि सगळीकडे चर्चा झाली. आजारपणातही त्यांनी भाजपच्या प्रचार सभेत हजेरी दर्शवली. तर, आता त्यांनी व्हीलचेअरवरून मतदानाला हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी अहिल्यादेवी शाळेत पोहचून मतदान केले. आजारपणातही ते मतदान करण्याचा हक्क विसरले नाहीत, म्हणून त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, आजचा मतदानाचा दिवस संपला असून दिवसभरात किती मतदान झाले? याची आकडेवारी आता समोर आली आहे.
Pune : पुण्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान
पुण्यामध्ये (Pune) कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निकाल हा २ मार्चला लागणार असून सर्वानाच उत्सुकता लागली आहे. कारण, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ही सरळ लढत असून कोण बाजी मारतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. कसबा पेठ मतदारसंघात आज १ वाजेपर्यंत १८.५ टक्के मतदान झाले. तर, दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात २०.६८ टक्के मतदान झाले आहे.
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून गोपनीयतेचा भंग; निवडणूक अयोग्य काय कारवाई करणार?
एकीकडे पुण्यामध्ये पोटनिवडणुकीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. तर दुसरीकडे कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने गोपनीयतेचा भंग केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोपनीयतेचा भंग केला असल्याचे समोर आले आहे. कसबा मतदारसंघामध्ये मतदान करत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनसोबतचा फोटो काढला.
Pune : कसबा पेठ पोटनिवडणूक; भाजपच्या माजी नगरसेवकावर मतदारावर हल्ला केल्याचा आरोप
आज पुण्यामध्ये (Pune) कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशामध्ये निवडणुकीआधी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहायला मिळाल्या. एकीकडे काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाट्ल्याचा आरोप केला. तर, आज कसबा मतदारसंघामध्ये एका मतदाराने भाजपच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. गंजपेठेमध्ये हा प्रकार घडला असून, अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
कार्यकर्त्यांवर कारवाई करणे राज ठाकरेंना पडले महाग; पुण्यात मनसेला भलेमोठे खिंडार
काल कसब्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षातील ७ कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. कारण, त्यांनी पक्षाचे आदेश न पाळता कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केला. मात्र, मनसेने केलेल्या या कारवाईमुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण, एकीकडे पुण्यात पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे राज ठाकरेंची चिंता नक्कीच वाढली आहे.
Pune : कसबा पोटनिवडणूक; काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने मनसेने केली मोठी कारवाई
कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आली असताना मनसेतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केला म्हणून ७ मनसे सैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. अशामध्ये मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश असतानादेखील काही मनसे सैनिकांनी पक्षविरोधी कार्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Kasaba By Election : 'बापट साहेबांना पाहून...' या उमेदवाराने केली मोठी घोषणा
काल भाजपचा प्रचार करण्यासाठी (Kasaba By Election) भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. नाकात नळी, सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर आणि व्हीलचेअरवरून त्यांनी प्रचाराला हजेरी लावली. अशामध्ये पुण्यात चर्चांना उधाण आले. 'आजारी असतानाही भाजपच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांना मैदानात यावे लागले. त्यांची अवस्था पाहून आज मी प्रचार करणार नाही.' असा संदेश हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी प्रसार माध्यमांना दिला.
व्हिलचेअरवरुन भाजप खासदार गिरीश बापट पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारात
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपने टिळक कुटुंबातील सदस्यांपैकी कोणालाही तिकीट न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपाला फटका बसू शकतो अशी चर्चा असतानाच भाजपकडून पुण्यातील त्यांचे हुकमी एक्के मानले जाणारे खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे. त्यांनी आज हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी गिरीश बापटदेखील उपस्थित होते.
पुण्याचे किंगमेकर उतरणार मैदानात; गिरीश बापट भाजपसाठी करणार प्रचार
पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी आता महाविकासह आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर, दुसरीकडे आता भाजपसाठी पुण्याचे किंगमेकर खासदार गिरीश बापट प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे प्रचाराला सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रचारासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. आज ते नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
Pune : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा कोणाला? वसंत मोरेंच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची कोंडी?
आज कसबा पेठ (Kasaba By-Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad By-Election) अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणते नेते आपला अर्ज मागे घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तर, दुसरीकडे मनसेने (MNS) या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असून ते भाजपला (BJP) पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rohit Pawar : 'राज ठाकरेंनी भाजपच्या नादी...' राज ठाकरेंच्या त्या पत्रावर काय म्हणाले रोहित पवार?
सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून यासाठी नकार देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर लक्ष देता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना या पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी एक पत्र लिहिले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
Chandrashekhar Bawankule : "अजूनही वेळ गेलेली नाही..." असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
आज भाजपकडून शक्तिप्रदर्शन करत कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasaba By Election) हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, यावेळी मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी का देण्यात आली नाही? अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरून भाजपने (BJP) प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, "वेळ आहे उमेदवार बदलता येईल" असे सूचक विधान केले.
Kasaba By Election : कॉंग्रेसने जाहीर केला उमेदवार; भाजपकडून पुण्यात शक्तिप्रदर्शन
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasaba By Election) आज दोन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे (Congress) उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव घोषित केले. तर, भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली. अशामध्ये आता आज दोन्ही पक्षाचे उमेदवार पोटनिडवणुकीसाठी अर्ज दाखल केला. अशामध्ये आज भाजपकडून यावेळी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजप उमेदवार कसबा ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पायी रॅली काढली.
Raj Thackeray : 'मी सुरुवातीपासूनच...' राज ठाकरेंनी लिहिले सर्वपक्षीय नेत्यांना पत्र
सध्या कसबा पेठ (Kasaba By-Election) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. एकीकडे भाजपने (BJP) या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील पत्र लिहीत सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, "महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे दुःखद निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांत पोटनिडणुका होत आहेत.
Pune By-Election : पुणे पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने; संजय राऊत म्हणतात...
केंद्रीय निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आणि प्रत्येक घटक पक्षात चढाओढ सुरु झाली. काही दिवसांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निशाण झाले. त्यानंतर ही पोटनिवडणूक लावण्यात आली. हेही वाचा : Mukta Tilak : कर्करोगाशी दोन हात करताना कर्तव्य बजावणाऱ्या मुक्ता टिळक यांचे निधन मात्र, भाजपने या दोनही जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी अशी मागणी केली होती.
Kasaba By-Election : कसबा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेला द्या; राष्ट्रवादीकडे केली मागणी
काही दिवसांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघाच्या (Kasaba By-Election) आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. तसेच, पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचेही निधन झाले. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोनही मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली. यानंतर आता या दोनही निवडणुका बिनविरोध होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कसबा पेठ मतदारसंघामध्ये भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता महाविकास आघाडीच्या हालचाली पाहता, ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Kasaba
Contact Kasaba, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack