पुणेएका तासापूर्वी कॉपी लिंक दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम ही निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला असून मंगळवारपासून (31 जानेवारी) आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंगळवारी दिले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.