Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Pune Bypoll Election
Pune Bypoll Election : मे महिना संपत आला तरी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही?
Pune Bypoll Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची सज्जता, मतदार याद्या अद्ययावत करणे अशी कामे सुरु आहेत. त्याचबरोबर पुण्यात कर्नाटकहून मतदान यंत्रे देखील दाखल झाली आहेत. सर्वसाधारण निवडणुकीच्या तयारीचाही भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे जसा मे महिना संपत येत आहे तशी पोटनिवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे.
Pune Lok Sabha Bypoll NCP Leader Ajit Pawar Statement On Regarding Pune By Election Candidate
Pune Bypoll election : गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक होणार का? असा प्रश्न आता राजकीय नेतेच विचारू लागले आहेत . लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकांना फक्त एक वर्ष उरलेलं असताना निवडणूक आयोग ही पोटनिवडणूक घेईल का? अशी शंका व्यक्त होत आहे तर दुसरीकडे खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले सर्वपक्षीय नेते मात्र स्वतःचा दावा कोणत्या न कोणत्या मार्गाने पुढं नेताना दिसत आहेत. त्यात आज अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
Weekly Recap : पुणे पोटनिवडणुकीसह दहावीची परीक्षा ते कांदा प्रश्न, वाचा आठवड्यातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 27 फेब्रुवारी ते 4 मार्च यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यातील महत्वाची घडामोड म्हणजे पुणे मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा लागलेला निकाल. तसेच त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील निवडणुकींचा निकालही या आठवड्यात लागला आहे. तसेच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसह ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात केलेला भारताचा पराभव यासह विविध घडामोडी या आठवड्यात घडल्या आहे.
Abhijeet Bichukale Pune Bypoll Election : आतापर्यंत 47 मतं, चर्चा आणि चाहतावर्ग मते मात्र सतेचाळीस ABP Majha
तुम्हाला राजकारणातल्या बातम्यांमध्ये Interest असो वा नसो...पण राजकारणातलं सध्याचं एक असं व्यक्तीमत्व आहे जे बोलत असताना तुम्ही शक्यतो त्यांना इग्नोर नाही करु शकत...त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा असते ती त्यांच्यातल्या कॉन्फिडन्सची. पुण्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल आत्ताच लागलेत...अनेक नावांची चर्चा होती. पण जवळपास कित्येक निवडणुकांमधलं एक कॉमन नाव, ज्याची नुसती चर्चाच नाही होत तर त्यांच्या कॉन्फिडन्सची भले भले दाद देतात.
Nana Patole Pc : ...तर चिंचवडमध्येही मविआच विजय झाला असता kasba Chinchwad Bypoll Result
Nana Patole Pc : ...तर चिंचवडमध्येही मविआच विजय झाला असता kasba Chinchwad Bypoll Result
Shiv Sainik on Kasba bypoll result: 'मातोश्री'वरुन आदेश आला, शिवसैनिक तुटून पडला
पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला तब्बल २८ वर्षांनी पराभव स्वीकारण्याची वेळ आली. या मतदासंघातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी धुव्वा उडवला
Kasba By-election Results 2023 : पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर; भाजपची धाकधूक वाढली
Kasba By-election Results 2023 : कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.
Pune Bypoll Elections: पुण्यात गुलाल कुणाचा? कसबा, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात
By : एबीपी माझा ब्युरो | Updated: 02 Mar 2023 09:21 AM (IST) कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात... पोस्टल मतमोजणीत चिंचवडच्या अश्विनी जगताप आघाडीवरकसबा आणि चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार?... महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे.
Pune Bypoll Election Results 2023 Live Updates: Counting of votes for Kasba, Chinchwad Assembly byelections begins, BJP, Eknath Shinde's Shiv Sena Against Uddhav Thackeray - Bharat Times
Pune Bypoll Election Results 2023 Live Updates: Counting of votes for the byelections to Kasba and Chinchwad Assembly constituencies in the Pune district of Maharashtra started on Thursday (March 2, 2023). The counting started at 8 am for the bypolls that took place on February 26 for the two seats held by the Bharatiya Janata Party (BJP). The average voter turnout in both constituencies was 50 per cent.
Pune By-Poll Results 2023 LIVE Updates: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज; मतदारांचा कौल कुणाला?
Pune By-Poll Results LIVE Updates: चिंचवड आणि कबसा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्या दिवसापासून वादात राहिलेल्या पोटनिवडणुकीत मतदार राजानं कोणाला कौल दिलाय हे स्पष्ट होणार आहे. By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 02 Mar 2023 06:34 AM (IST) Chinchwad Bypoll Results 2023 LIVE : चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 37 फेऱ्या, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार Chinchwad Bypoll Results 2023 LIVE : सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे.
Pune Bypoll Results : कसबा-चिंचवडची पोटनिवणुकीची आज मतमोजणी; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
Pune Bypoll Results : पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Special Report Pune Bypoll Election : मतदारांचा एक्झिट पोल 'माझा'वर कसब्यातील कौल कोणाच्या बाजूनं?
मुख्यपृष्ठ टीवी शोज  / स्पेशल रिपोर्ट Special Report Pune Bypoll Election : मतदारांचा एक्झिट पोल 'माझा'वर कसब्यातील कौल कोणाच्या बाजूनं? By : abp majha web team | एबीपी माझाच्या पोटनिवडणूक स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. गेला एक महिना राज्यात दोन विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. चिंचवड आणि कबसा पेठ.. या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. आणि त्याचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय. त्यातच प्रत्येकाला उत्सुकता लागलीय की दोन्ही ठिकाणी कुणाचा विजय होणार...
Pune Bypoll Election : मतमोजणीदरम्यान कोरेगाव पार्कमध्ये नो व्हेईकल झोन; कशी असेल वाहतूक व्यवस्था?
Pune Bypoll Election : कसबा पेठ विधानसभा (Pune Bypoll Election) मतदारसंघाची मतमोजणी 2 मार्च (गुरुवार) रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी 1 मार्च (बुधवार) सकाळी 11 ते 2 मार्च (गुरुवारी) मतमोजणी पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतूक वळवण्याचे नियोजन केले आहे. वाहतूक वळवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालील आदेश जारी करण्यात आले आहेत.
Pune Bypoll Election : चिंचवडचा भावी आमादर ठरला ! अश्विनी जगतापांच्या विजयाचे बॅनर्स झळकले
By : एबीपी माझा वेबटीम | Updated: 01 Mar 2023 11:43 AM (IST) पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे. निकालाच्या अगोदरच मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याचे फलक लावण्यात आलेत.
भाजपला कसबा-चिंचवडची पोटनिवडणूक हाताळता आली नाही; अजित पवारांचा हल्लाबोल
Pune Bypoll election : भाजपला कसबा आणि चिंचवडची (Pune Bypoll Election) पोटनिवडणूक हाताळता आली नाही. कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा एकदा निकाल लागू द्या, मग चिंचवड आणि कसब्यात भाजपकडून काय घडलं आणि त्यांनी काय केलं हे सगळं सांगतो, असा हल्लाबोल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. ते म्हणाले की, कसबा आणि चिंचवडच्या मतदारांचा मी आदर करतो मात्र या निवडणुकीसाठी पुण्यात भाजपच्या अनेक नेत्यांना तळ ठोकून बसावं लागलं.
Pune Bypoll Election : कसब्यात भाजपला धक्का? रविंद्र धंगेकर विजयी होणार... चिंचवड भाजप राखणार; व्हायरल होतोय एक्झिट पोल
Pune Bypoll Election : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी दोन एक्झिट पोल व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होतील असं म्हटलं आहे. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपला धक्का मिळणार आहे.
Pune Bypoll Election Kasba Bypoll Election Mahavikas Aaghadi Ravindra Dhangekar Vs Bjp Hemant Rasane
Pune Bypoll election : पुण्यात कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election)भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदर रविंद्र धंगेकर यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. कसब्यात एकूण 50.06 टक्के मतदान पार पडलं. त्यानंतर अख्या पुण्यात एकच चर्चा रंगली की भावी आमदार नेमका कोण होणार? दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांचा आमदार विजयी असे बॅनर्सदेखील लावले. रासनेंच्या समर्थकांनी रासनेंचं भावी आमदार म्हणून अभिनंदन आणि धंगेकरांच्या समर्थकांनी धंगेकरांना भावी आमदार म्हणून जाहीर करुन टाकलं आहे.
आपल्या नावावर भलत्यानेच मतदान केलं! कसब्यात बोगस मतदान झाल्याचा मतदारांचा आरोप
Pune Bypoll election : अनेकदा आपण निवडणुकीत (Pune Bypoll Election ) बोगस मतदान होत असल्याचे आरोप प्रत्यारोप होत असल्याचं बघितलं आहे. आज कसबा मतदारसंघात देखील मतदारांना असाच अनुभव आला. अनेकांना ते जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच मतदान आधीच कोणीतरी केल्याच आढळून आलं.
Kasba Bypoll Election The-names-of-dead-person-in-the-list-but-the-living-name-are-missing-in-the-voter-list
Pune Bypoll election : कसबा विधानसभा (Pune Bypoll Election)मतदार संघात तीन वाजेपर्यंत फक्त 20.05 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामळे या टक्केवारीतून पुणेकरांनी मतदानाला पाठ फिरवल्याचं पुढे आलं आहे. मृत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी निवडणुक आयोग जबाबदार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.
नागरिकांचा मतदानासाठी उत्साह ते दोन गटात हाणामारी; आतापर्यंत पुणे पोटनिवडणुकीत काय काय घडलं?
Pune Bypoll election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Pune Bypoll Election) (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलं. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश होता.
Pune Bypoll Election How Much Expenditure By Which Candidate In Kasab For Campaigning
Pune Bypoll election : पुण्यात कसबा आणि (Pune Bypoll Election)चिंचवड मतदरसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. कालपर्यंत प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. प्रचारासाठी लाखो रुपयांनी उधळण केली. प्रचार आणि निवडणूक म्हटलं की पैशांचा नुसता पाऊस असतो मात्र कसब्यातील भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत फार कमी पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे. पैसे वाटपाचे आरोप होत असताना विरोधी पक्षांनी एकमेकांवर या गैरव्यवहाराचे आरोप केले गेले. त्यामुळे कसब्यात रविंद्र धंगेकरांनी उपोषण केलं.
Pune : कसबा पेठ पोटनिवडणूक; भाजपच्या माजी नगरसेवकावर मतदारावर हल्ला केल्याचा आरोप
आज पुण्यामध्ये (Pune) कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशामध्ये निवडणुकीआधी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहायला मिळाल्या. एकीकडे काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाट्ल्याचा आरोप केला. तर, आज कसबा मतदारसंघामध्ये एका मतदाराने भाजपच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. गंजपेठेमध्ये हा प्रकार घडला असून, अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
Pune By Poll Election Candidates Ashwini Jagtap Son And Nana Kate Daughter Voted For The First Time For Their Parent
Pune Bypoll election : पुण्यात कसबा (Pune Bypoll Election)आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad By Poll Election) पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलं आहे आणि ते मतदान त्यांच्या पालकांसाठी केलं आहे. आयुष्यातलं पहिलंच मत आपल्या पालकांना केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे आणि हा त्यांच्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण आहे, अशा भावना उमेदवारांच्या मुलांनी व्यक्त केल्या आहे.
Pune By Poll Election Voting Welcoming Voters With Rangolis And Rose Flowers
By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 26 Feb 2023 08:45 AM (IST) Pune By Poll Election : कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे. कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 साठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 270 मतदान केंद्रांवर कसबा मतदार संघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदार संघाचे उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
मुख्यंमत्र्यांचं भाषण 5 वाजेनंतर सुरुच होतं मग आचारसंहितेचा भंग कुणी केला?
Pune Bypoll election : मतदानासाठी काहीच तास बाकी राहिले (Pune Bypoll Election) आहेत मात्र भाजप आणि महाविकास आघाडीत अजूनही आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरुच आहे. कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आचासंहिता भंग केली असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर रविंद्र धंगेकरांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाला नोटीस पाठवायची असेल तर आधी भाजपला नोटीस द्या आणि मगच मला नोटीस द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Pune Bypoll Election Abhijit Bichukle Demanded That Cancel Pune Bypoll Election
Pune Bypoll election : कसबा विधानसभा पोटनिवडणूकच्या (Pune Bypoll Election) मतदानाला काही तास बाकी असताना अनेक नाट्यमय घटना घडताना दिसत आहेत. कसबा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अभिजीत बिचुकले हे कसबा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना देखील भाजप आणि कॉंग्रेसने प्रचार केला असल्याचा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
Pune Bypoll Election Is That Amol Kolhe Indirectly Support To Independent Candidate Rahul Kalate In Chinchwad
Pune bypoll election : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेनी (amol kolhe) चिंचवड विधानसभेतील मविआचे बंडखोर राहुल कलाटेंचा (Rahul kalate) अप्रत्यक्षरीत्या (Pune Bypoll Election) प्रचार केला आहे. नाना काटे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असताना कोल्हेनी शिट्टी वाजवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. एबीपी माझाने कोल्हे यांची याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. अमोल कोल्हे आणि राहुल कलाटे यांची मैत्री सर्वश्रुत आहे.
Pune Bypoll Election : रविंद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव
Pune Bypoll Election : भारतीय जनता पक्षाकडून (Pune Bypoll Election) कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
Pune Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांनी अखेर उपोषण मागे घेतले
पोलीस कारवाईच्या आश्वासनानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले आहे. भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे. कसबा पोटनिवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना पुण्यात पैशांचा पाऊस पडत आहे. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडत आहे. या सर्व प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
Pune Bypoll Election Congress Candidate Ravindra Dhangekar Hunger Strike Over The Assurance Of Police Action
Ravindra dhangekar : पोलिसांच्या कारवाईच्या (Pune Bypoll Election) आश्वासनानंतर कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतलं आहे. भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केले असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे.
Pune Bypoll Election Jagadish Mulik Denied Dhangekars Allegations
Pune Bypoll election : कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election) मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा थेट आरोप कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहेत. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले.
Pune Bypoll Election Eknath Shinde Met Deepak Paygude For Kasba Bypoll Election
Pune bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) पार्श्वभूमीवर रोज नव्या घडामोडी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मनसे नेते दीपक पायगुडे यांची राहत्या घरी भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तळ ठोकून आहेत. आज कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी थेट मनसे नेते दीपक पायगुडे यांची भेट घेतली. ही भेट अनेक कारणांनी महत्वाची मानली जात आहे.
Pune Kasaba Bypoll Election Congress Ravindra Dhangekar Criticize Bjp After Election Campaign
Pune Bypoll election : कसबा मतदारसंघात (Pune Bypoll Election) भाजपचा कमीत कमी मतांनी पराभव व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल कसब्याचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. कसब्यात रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात तगडी लढत आहे. त्यासाठी रविंद्र धंगेकरांना हरवण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Pune Bypoll Election Ashwini Jagtap Nana Kate Rahul Kalate Election Campaigned In Chinchwad
Pune Bypolle election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (rahul kalate) या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला. अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. नाना काटे यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या तर संपूर्ण प्रचारादरम्यान कायम मतदारांच्या भेटी घेणाऱ्या राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशी मात्र शक्तीप्रदर्शन केलं.
Pune Bypoll Election : पुण्यात मनसेला मोठं खिंडार; सात जणांच्या हकालपट्टीमुळे 50 मनसैनिकांचा पक्षाला 'राम राम'
Pune Bypoll election : पुण्यात सध्या (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात मनसेला (MNS) मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे 50 मनसैनिकांनी आपले राजीनामने दिल्याची माहिती आहे. मनसेने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
Pune Crime : एकीकडे प्रचाराचा धुराळा दुसरीकडे चोरांनी केला हात साफ; कसब्यात 6 घरफोडीचे प्रयत्न
Pune Bypoll election : कसबा आणि चिंचवड विधानसभा (Kasba Bypoll Election) पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणूक काळात कसबा मतादार संघात विविध पक्षाचे बडे नेते विविध भागात प्रचारात उतरत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या (Crime) कारणास्तव पोलिसांचा रस्त्यावर चोख बंदोबस्त तैनात आहे. परंतु असं असताना देखील कसबा मतदार संघात सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कसबा भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि चोख बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला आहे.
पुण्यात आज पॉलिटिकल फ्रायडे, कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार थांबणार, कोणाकोणाचे रोड शो?
Pune Bypoll Election : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा (Election Campaign) आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करणार आहेत. पुण्यात आज पॉलिटिकल फ्रायडे, कोणाकोणाचे रोड शो?
Ravindra Dhangekar Will Not Won Pune Bypoll Election Said Dcm Devedra Fadanvis In Election Rally Of Hemant Rasne
Pune Bypoll election : कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही, (Pune Bypoll Election) मात्र आलाच तर पुण्येश्वर मंदिराबाबत धंगेकरांची भूमिका काय? कॉंग्रेसची भुमिका काय आहे?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उपस्थित केला आहे. ते कसबा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. कसब्याची लढाई राष्ट्रवादाची आणि हिंदुत्ववादाची आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे.
Pune Kasba By Election BJP Leaders Girish Mahajan Ravindra Chavan Praveen Darekar Have Been Entrusted With The Responsibility Of Kasba Constituency
Pune Bypoll election : पुण्यात कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याच्या नेत्याचं लक्ष लागलं आहे. कसब्याची निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपकडून चांगलीच तयारी सुरु आहे. प्रचारासाठी फक्त काही तास बाकी आहेत.
दगडूशेठ मंडळाच्या गोडसे परिवाराचा रविंद्र धंगेकरांना पाठिंबा? भाजपची धाकधूक वाढण्याची शक्यता
Pune Bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकीत रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे विश्वस्त अक्षय गोडसे यांनी कसबा पेठ निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Pune Bypoll Election) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरल्या आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात तगडी लढत आहे.
Pune Bypoll Election BJP Cancel The Meeting Of Eknath Shinde Devendra Fadnavis In Kasba Constituency
Pune bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकीची (Pune Bypoll Election) रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. मात्र कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महlत्त्वाच्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची या निवडणुकीत एकही सभा होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये आज सभा, रोड शोचा धडाका; भाजप, मविआकडून प्रचाराचा धुरळा, कोणकोणते नेते पुण्यात?
Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा प्रचार (Election Campaign) शुक्रवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे आजची (23 फेब्रुवारी) संध्याकाळ ही नेत्यांच्या सभांची शेवटची संध्याकाळ असणार आहे. त्यामुळे आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते मैदानात उतरणार आहेत. पुण्यात आज कोणकोणते नेते प्रचाराला?
कम मतदान की स्थिति में भाजपा की उम्मीदवारी पर विचार किया जाएगा; नगरसेवकों को फडणवीस की तांबी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कस्बा पेठ विधानसभा क्षेत्र के 16 निर्दलीय पार्षदों से कहा कि यदि मतदान प्रतिशत घटता है या भारतीय जनता पार्टी को कम वोट मिलते हैं तो संबंधित वार्डों में पार्षदों की उम्मीदवारी पर विचार किया जाएगा. उन्होंने शक्तिकेंद्र प्रमुख से सीधे बातचीत कर अभियान की समीक्षा भी की.
राजकीय फायद्यासाठी गणपती बाप्पाचा वापर करणं बंद करा; रविंद्र धंगेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत
Pune Bypoll election ravindra dhangekar : पुण्यातील कसबा (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीत चुरशीची लढत सुरु आहे. कसब्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात करण्यात आलेली बॅनरबाजी निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात आता राजकीय फायद्यासाठी देवांचा वापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत हा आरोप केला आहे.
चिंचवडमधील ठाकरे गटाच्या 8 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; राहुल कलाटेंचा प्रचार केल्याचा ठपका
Pune Bypoll Election : एकीकडे चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी (Pune Bypoll Election) सुरु आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आठ शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत पक्षविरोधी काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अपक्ष आमदार राहुल कलाटे यांनी बंंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
चिंचवड-कसब्याच्या प्रचारादरम्यान आज होणार 'काटे की टक्कर';भाजप, मविआचे 'हे' तडफदार नेते मैदानात
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार (Pune Bypoll Election) संघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्राचाराचा शेवटचा आठवडा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रचासासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी कसब्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रचार यात्रा सुरू आहे. त्यासोबतच चिंचवड मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.
Chinchwad Bypoll Election : पेड न्यूज प्रकरणी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Chinchwad Bypoll Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा (Pune Bypoll Election) उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस धाडली आहे. पेड न्यूज (Paid News) प्रकरणात ही नोटीस दिल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष समितीकडून पडताळणी पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरुन भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मैदानात, राष्ट्रवादीच्या नाना काटेंसाठी आज धनंजय मुंडे यांची जाहीर सभा
पिंपरी चिंचवड : राजकारणामध्ये भाऊबंदकी नवी नाही. राजकारणामुळं अनेकांच्या घरांमध्ये दरी निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक कुटुंबांमध्ये राजकारणामुळं दुरावा निर्माण झाला आहे. राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांच्या नात्याची कायमची चर्चा असते. पुण्यातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) मुंडे भाऊ बहिणीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या अश्विनी जगतापांसाठी काल पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर सभा घेतली होती.
Ravindra Dhangekar : धंगेकरांच्या 'त्या' चॅलेंजची आजही होतेय चर्चा, काय होतं ते चॅलेंज?
Ravindra Dhangekar : नेते मंडळी म्हटलं की साधारण (Pune Bypoll Election) पांढरी किंवा काळी आलिशान कार, पांढरे चकचकीत कपडे, काळे पॉलिश केलेले बुट आणि आजुबाजूला दहा-पंधरा कार्यकर्ते असं चित्र आपल्या समोर उभं राहतं. महाराष्ट्रातील नेत्यांंचं बघितलं तर अनेक नेतेमंडळी याच पोशाखात दिसतात. सध्या पुण्यातदेखील अशाच पोशाखातील अनेक नेते पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरलेले दिसत आहेत. धुमधडाक्यात प्रचारही करताना दिसत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी कसब्याचं चित्र वेगळं होतं.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Pune Bypoll
Contact Pune Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack